Australia vs India, 2nd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना ॲडलेड येथील ओव्हल मैदानात खेळवण्यात येत आहे. या सामन्यात पुन्हा एकदा नाणेफेकीच्या वेळी भारतीय संघाचा कर्णधार शुबमन गिलच्या पदरी निराशा आली. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्श याने नाणेफेक जिंकून पहिल्या सामन्याप्रमाणे पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यजमान ऑस्ट्रेलियन संघाने फिलीपच्य जागी अॅलेक्स केरी आणि एलिसच्या जागी झेवियर बार्टलेट याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. टीम इंडियानं मात्र कोणत्याही बदलाशिवाय मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे फक्त मैदान बदलले, पण नाणेफेकीच्या वेळी ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं कौल लागण्यासोबत टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन निवडण्यापर्यंत जे काही घडलं ते सगळं पहिल्यासारखेच आहे.
भारत प्लेइंग इलेव्हन :
रोहित शर्मा, शुबमन गिल (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, नितीश कुमार रेड्डी, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन :
मिचेल मार्श (कर्णधार), ट्रॅविस हेड, मॅथ्यू शॉर्ट, मॅट रेनशॉ, अॅलेक्स केरी (यष्टीरक्षक), कूपर कॉनोली, मिचेल ओवेन, झेवियर बार्टलेट, मिचेल स्टार्क, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड.
Web Summary : Australia won the toss, opting to bowl first in the second ODI against India. Australia made two changes to their team, while India remained unchanged. Despite the venue shift, the toss outcome and team selection mirrored the first match.
Web Summary : ऑस्ट्रेलिया ने टॉस जीतकर भारत के खिलाफ दूसरे वनडे में पहले गेंदबाजी करने का फैसला किया। ऑस्ट्रेलिया ने टीम में दो बदलाव किए, जबकि भारत अपरिवर्तित रहा। स्थान परिवर्तन के बावजूद, टॉस का नतीजा और टीम का चयन पहले मैच जैसा ही रहा।