Joe Root Now Less Than 2000 Runs Away From Sachin Tendulkar's Record Of 15,921 Test Runs : सिडनीच्या एससीजी मैदानावर सुरू असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या अॅशेस कसोटी सामन्यात अनुभवी फलंदाज जो रूटनं दमदार शतक झळकावले. त्याच्या विक्रमी शतकाच्या जोरावर इंग्लंडच्या संघाने पहिल्या डावात सर्व बाद ३८४ धावांपर्यंत मजल मारली. मोठ्या शतकी खेळीसह जो रुटनं ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंगचा मोठा विक्रम मोडीत काढला. आता त्याच्या नजरा विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या ऐतिहासिक विक्रमावर आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
रूटनं केली पाँटिंगच्या या विक्रमाशी बरोबरी
जो रुटनं २४२ चेंडूत १५ चौकाराच्या मदतीने १६० धावांची खेळीसह रिकी पाँटिंगला मागे टाकले आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत तो पाँटिंगच्या पुढे निघून गेला आहे. याशिवाय ४१ व्या शतकासह रुटनं कसोटीत सर्वाधिक शतके झळकवणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पाँटिंगच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा डावही साधला आहे. कसोटीत सर्वाधिक वेळा १५० पेक्षा अधिक धावा करण्याचा विक्रम अद्यापही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. आपल्या कसोटी कारकिर्दित सचिन तेंडुलकरनं २० वेळा १५० किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तेंडुलकरनंतर या यादीत ब्रायन लारा (१९) आणि कुमार संगकारा (१९) संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहेत.
कसोटीत सर्वाधिक वेळा १५० पेक्षा अधिक धावा करणारे फलंदाज
- २० - सचिन तेंडुलकर
- १९- ब्रायन लारा
- १९ - कुमार संगकारा
- १८ - डॉन ब्रॅडमन
- १७ - जो रूट*
- १६ - महेला जयवर्धने
- १५ - रिकी पाँटिंग
सचिनचा ऐतिहासिक विक्रम धोक्यात विक्रम धोक्यात?
जो रूट हा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा (१५,९२१) सचिन तेंडुलकरचा जागतिक विक्रम मोडण्याच्या दिशेने वेगाने पुढे सरकत आहे. सिडनी कसोटीतील कामगिरीनंतर रूट आणि सचिन यांच्यातील अंतर आता २,००० धावांपेक्षा कमी राहिले आहे. सध्या तो कसोटी क्रिकेटमधील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. सातत्यपूर्ण धावसंख्येमुळे सचिनचा ऐतिहासिक विक्रम भविष्यात धोक्यात येऊ शकतो, असे चित्र दिसत आहे.
Web Summary : Joe Root's century in the Ashes Test puts him on par with Ricky Ponting, threatening Sachin Tendulkar's all-time Test runs record. Root surpassed Ponting in scoring 150+ runs and equaled his century record. He is now less than 2000 runs away from Tendulkar's milestone.
Web Summary : जो रूट के एशेज टेस्ट में शतक ने उन्हें रिकी पोंटिंग के बराबर ला खड़ा किया है, जिससे सचिन तेंदुलकर के टेस्ट रनों का रिकॉर्ड खतरे में है। रूट ने पोंटिंग को 150+ रन बनाने में पीछे छोड़ दिया और उनके शतक के रिकॉर्ड की बराबरी की। वह अब तेंदुलकर के मील के पत्थर से 2000 रन से भी कम दूर हैं।