Duleep Trophy : नवख्या गोलंदाजाची हवा! चार चेंडूत चार विकेट्स घेत रचला नवा इतिहास

जम्मू काश्मीरच्या औकि​ब नबीनं विक्रमी 'चौकारा'सह मारला 'पंजा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 20:57 IST2025-08-29T20:49:03+5:302025-08-29T20:57:22+5:30

whatsapp join usJoin us
Auqib Nabi Dar Scripts History He Becomes First Player To 4 Wickets In 4 Balls Duleep Trophy 4th Indian In First Class Cricket | Duleep Trophy : नवख्या गोलंदाजाची हवा! चार चेंडूत चार विकेट्स घेत रचला नवा इतिहास

Duleep Trophy : नवख्या गोलंदाजाची हवा! चार चेंडूत चार विकेट्स घेत रचला नवा इतिहास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Auqib Nabi Dar Scripts History Becomes First Player To 4 Wickets In 4 Balls : देशांतर्गत क्रिकेटमधील दुलीप करंडक स्पर्धेत अनेक स्टार क्रिकेटर आपल्यातील धमक दाखवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. एका बाजूला शमी आणि अर्शदीप सिंह यासारखे गोलंदाज ज्या सामन्यात आपली छाप सोडायला कमी पडले तिथं अनकॅप्ड गोलंदाजाने पंजा मारत खास विक्रमी डाव साधला आहे. एक नजर दुलीप करंडक स्पर्धेतील गोलंदाजीत सेट झालेल्या खास विक्रमावर

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

जम्मू काश्मीरच्या औकि​ब नबीनं विक्रमी 'चौकारा'सह मारला 'पंजा'

दुलीप करंडक स्पर्धेत उत्तर विभाग संघाकडून (North Zone) मैदानात उतरलेल्या जम्मूच्या औकिब नबी याने पूर्व विभाग (East Zone) संघाविरुद्ध  पाच विकेट्सचा डाव साधला. ही कामगिरी करताना त्याने चार चेंडूत चार विकेट्स घेत इतिहास रचला आहे. दुलीप करंडक स्पर्धेत अशी कामगिरी करणारा तो पहिला गोलंदाज ठरला आहे. याशिवाय भारतीय क्रिकेटचा विचार करता चार चेंडूत चार विकेट्स घेणारा तो चौथा गोलंदाडज ठरलाय. 

Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास


१९८८ मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली होती अशी कामगिरी

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात १९८८-८९ च्या रणजी हंगामात दिल्लीच्या संघाकडून शंकर सैनी याने पहिल्यांदाच सलग चार चेंडूत चार विकेट्स घेण्याचा पराक्रम करून दाखवला होता. हिमाचल प्रदेश विरुद्ध त्याने ही विक्रमी कामगिरी नोंदवली होती. त्यानंतर २०१८ मध्ये जम्मू काश्मीरच्या मोहम्मद मुधासिर याने राजस्थानविरुद्ध तर २०२४ मध्ये मध्य प्रदेशच्या कुलवंत खेजरोलिया याने बडोदा संघाविरुद्ध अशी कामगिरी नोंदवली होती. आता दुलीप करंडक स्पर्धेत औकिब नबीनं ही कामगिरी करून दाखवलीये. 

औकिब नबीची कारकिर्द

औकिब नबी याचा जन्म ४ नोव्हेंबर १९९६ मध्ये जम्मू काश्मीरमध्ये झाला. आतापर्यंत प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २९ सामन्यात त्याने ९० विकेट्स आपल्या खात्यात जमा केल्या आहेत. यात त्याने ४ वेळा चार विकेट्स आणि ८ वेळा पाच विकेट्सचा डाव साधला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये त्याने २९ सामन्यात ४२ विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय २७ टी-२० सामन्यात त्याच्या खात्यात २८ विकेट्स जमा आहेत.
 

Web Title: Auqib Nabi Dar Scripts History He Becomes First Player To 4 Wickets In 4 Balls Duleep Trophy 4th Indian In First Class Cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.