Join us
Daily Top 2Weekly Top 5

"न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्येही हल्ले होतात, तेव्हा इतका आकांडतांडव केला जात नाही"

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरन सॅमी यानं न्यूझीलंडनं पाकिस्तान दौऱ्यातून ऐनवेळी घेतलेल्या माघारीवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2021 20:27 IST

Open in App

वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार डॅरन सॅमी यानं न्यूझीलंडनंपाकिस्तान दौऱ्यातून ऐनवेळी घेतलेल्या माघारीवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. दहशतवादी हल्ले तर न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्येही होतात. पण तेव्हा इतका आकांडतांडव केला जात नाही, असं रोखठोक विधान डॅरन सॅमीनं केलं आहे. याआधीही सॅमीनं न्यूझीलंडच्या निर्णयाचा कडाडून विरोध केला होता. 

पाकिस्तानचे इंग्रजीचे वांदे; न्यूझीलंडच्या निर्णयावर केलं ट्विट अन् ठरले 'Fool'!

पाकिस्तानच्या जिओ चॅनलला दिलेल्या मुलाखतीत डॅरन सॅमी म्हणाला, "मी गेल्या सहा वर्षांपासून पाकिस्तान दौऱ्यात क्रिकेट खेळत आहे आणि माझा चांगला अनुभव राहिला आहे. न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्येही आपण दहशतवादी हल्ले झाल्याचं पाहिलं आहे. ऑस्ट्रेलियातही अशा घटना समोर आल्या आहेत. जगात प्रत्येक ठिकाणी अशा घटना होत असतात. पण तेव्हा इतका आकांडतांडव केला जात नाही"

पाकिस्तानमध्ये आता पूर्वीसारखी परिस्थिती राहिलेली नाही. पाकिस्तान सुरक्षित आहे का? असं आधी विचारलं जायचं. पण आता पाकिस्तानात केव्हा जायचं? तिथं जाऊन काय खायचं? याचा विचार केला जातो. 

ख्रिस गेल IPL खेळणार नाही? पाकिस्तानात जाण्याची घोषणा केल्यानं चर्चांना उधाण!

न्यूझीलंडच्या संघानं नुकतंच सुरक्षेचं कारण देत पाकिस्तान दौऱ्यातून ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर न्यूझीलंडच्या संघावर जोरदार टीका केली जात आहे. डॅरन सॅमी पाकिस्तान प्रीमिअर लीगसाठी पाकिस्तानच्या दौऱ्यावर असतो. याच पार्श्वभूमीवर सॅमीनं पाकिस्तानातील सुरक्षेबाबत शंका व्यक्त करणाऱ्या न्यूझीलंडच्या संघावर निशाणा साधला आहे. 

दरम्यान, न्यूझीलंडच्या निर्णयावर पाकिस्तानी खेळाडू आणि पाक बोर्डानंही नाराजी व्यक्त केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी आयसीसीकडे हा मुद्दा मांडणार असल्याचं म्हटलं आहे. 

टॅग्स :पाकिस्तानवेस्ट इंडिजन्यूझीलंड
Open in App