Join us

Asia XI v World XI : विराट कोहली - ख्रिस गेल यांच्यात टशन रंगणार; जागतिक संघात दिग्गज खेळणार

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2020 08:37 IST

Open in App
ठळक मुद्देबांगलादेश क्रिकेट मंडळानं Asia XI vs World XI संघ जाहीर केलेआशिया एकादश संघात भारताच्या सहा खेळाडूंचा समावेश

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबूर रहमान ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीसह सहा भारतीय खेळाडू आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. बांगलादेश क्रिकेट मंडळानं ( बीसीबी) आशिया एकादश आणि जागतिक एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची नावं जाहीर केली. त्यामुळे आता विराट कोहली विरुद्ध ख्रिस गेल या दोन दिग्गजांमध्ये द्वंद्व पाहायला मिळणार आहे. 

पाकिस्तानी खेळाडूंना बीसीसीआयचा विरोध''आशिया एकादश संघात एकही पाकिस्तानी खेळाडू नसेल, याची खात्री आम्ही करून घेतली. आमचे मत स्पष्ट आहे, की दोन्ही देशांचे खेळाडू एकत्र येऊ नये,''असे बीसीसीआयचे सरचिटणीस यांनी जयेश जॉर्ज यांनी सांगितले होते. त्यामुळे या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू नाहीत. पण, पाकिस्तान क्रिकेट मंडळानं दुसरंच कारण दिलं आहे.

पीसीबीनं व्यग्र वेळापत्रकामुळे या सामन्यात पाक खेळाडू खेळणार नसल्याचे सांगितले आहे. ''जागतिक एकादश आणि आशिया एकादश यांच्यातले ट्वेंटी-20 सामने 16 ते 20 मार्च या कालावधीत होणार आहेत. या दरम्यान पाकिस्तान सूपर लीगही आहे आणि त्याचा अंतिम सामना 22 मार्चला होणार आहे. त्यामुळे दोन्ही स्पर्धांच्या तारखा बदलणे शक्य नाही. त्यामुळे आमचे खेळाडू खेळणार नसल्याचे आम्ही बीसीबीला कळवले आहे. त्यांनी आमची अडचण समजून घेतली आहे,'' असे पीसीबीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.  

भारताचे सहा खेळाडूया सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीसह लोकेश राहुल, शिखर धवन, रिषभ पंत, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव हे खेळणार आहेत. पण, विराट आणि लोकेश एकच सामना खेळणार आहेत. विराटकडून तसा अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. 

आशिया एकादश संघलोकेश राहुल *, रिषभ पंत, विराट कोहली*, शिखर धवन, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, लिटन दास, टी इक्बाल, मुश्फीकर रहीम, थिसारा परेरा, रशीद खान, मुस्ताफीजून रहमान, संदीप लामिछाने, लसिथ मलिंगा, मुजीब उर रेहमान ( * केवळ एका सामन्यासाठी) 

जागतिक एकादश संघ

अॅलेक्स हेल्स, ख्रिस गेल, फॅफ ड्यु प्लेसिस, निकोलस पूरण, ब्रेंडन टेलर, जॉनी बेअरस्टो, किरॉन पोलार्ड, आदील रशीद, शेल्डन कॉट्रेल, लुंगी एनगिडी, अँण्ड्य्रू टाय, मिचेल मॅक्लेघन

 

 

टॅग्स :विराट कोहलीख्रिस गेललोकेश राहुलरिषभ पंतमोहम्मद शामीकुलदीप यादव