Join us  

IPL 2020 साठी BCCIने पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे केली विनंती!

बीसीसीआयच्या मनसुब्यांना बसेल धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2020 12:19 PM

Open in App
ठळक मुद्देट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या निर्णयावर आयपीएलचे भवितव्य अवलंबूनपाकिस्तान क्रिकेट मंडळ घालतंय खोडा

इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) आयोजनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळावर ( बीसीसीआय) दबाव वाढत आहे. ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्थगित होण्याच्या मार्गावर आहे आणि त्यामुळे आयपीएल आयोजनासाठी बीसीसीआयने दंड थोपटले आहेत. पण, आयपीएलचे सुधारीत वेळापत्रक तयार करण्याबरोबरच त्यांच्यासमोरील अडचणी वाढत आहेत. आता बीसीसीआयला आयपीएलच्या १३ व्या मोसमासाठी पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडे ( पीसीबी) विनंती करावी लागत आहे. 

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून बिग बी होताहेत ट्रोल; 'ते' ट्विट होतंय व्हायरल

पीसीबीने कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक स्पर्धा खेळवण्याचा निर्धार बोलून दाखवला. त्यात त्यांनी पाकिस्तान सुपर लीग ( पीएसएल) खेळवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे बीसीसीआयची गोची होण्याची शक्यता आहे. पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी आशिया चषक होणारच असे बुधवारी जाहीर केले. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिराती येथे आशिया चषक खेळवण्याचा पीसीबीचा प्रयत्न आहे. शिवाय पीएसएलच्या उर्वरित सामने नोव्हेंबरमध्ये खेळवण्याचा त्यांचा विचार आहे. 

बीसीसीआयही आयपीएल सप्टेंबर-नोव्हेंबर मध्ये खेळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. पण, आशिया चषक झाल्यास बीसीसीआयसमोर मोठं संकट उभं राहू शकतं. त्यामुळे बीसीसीआयने पीसीबीला यंदा पीएसएल न खेळवण्याची आणि त्या तारखांमध्ये आशिया चषक खेळवण्याची विनंती केली आहे. "आशिया चषक यंदा होणे अवघड आहे. पण, पीसीबीने जाहीर केलेली तारीख त्यांच्यासाठी सोईची आहे, आमच्यासाठी नाही. त्यांनी पीएसएल पुढील वर्षापर्यंत पुढे ढकलल्यास काही तोडगा निघू शकतो. अन्यथा आशिया चषक होणे शक्य नाही," असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले.

आयपीएलबाबत वसीम खान यांना विचारले असता ते म्हणाले,''आयपीएल केव्हा होईल, याची आम्हाला कल्पना नाही. पण, सध्या आम्ही सप्टेंबर-ऑक्टोर हा कालावधी आशिया चषक स्पर्धेसाठी उपलब्ध आहे.''  

पाकिस्तान क्रिकेट मंडळाला वाटतेय भीती; BCCI कडून मागितली लेखी हमी

खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह, तरीही IPL 2020 होऊ न देण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील; आखला खास प्लान

टॅग्स :बीसीसीआयआयपीएल 2020पाकिस्तानएशिया कप