दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेश संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लिटन दास आणि मेहदी हसन यांनी दमदार सुरूवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावा जोडताना यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतील बांगलादेशसाठी पहिल्या विकेटसाठी सर्वोत्तम भागीदारी नोंदवली. याशिवाय या जोडीने भारताविरुद्ध आशिया चषक स्पर्धेतील पाचवी सर्वोत्तम भागीदारी केली. यासह या जोडीने 18 वर्षांपूर्वीचा विक्रमही मोडला.
आशिया चषक स्पर्धेत बागंलादेशच्या सलामीच्या फलंदाजांचा साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे अंतिम लढतीत त्यांनी बॅटींग ऑर्डरमध्येच बदल करताना
भारतीय गोलंदाजांसमोर आव्हान उभे केले आहे. सलामीची कमकुवत बाब लक्षात घेता बांगलादेशने अंतिम सामन्यात अष्टपैलू खेळाडू मेहदी हसनला सलामीला पाठवण्याचा प्रयोग केला. मेहदी प्रथमच सलामीला आला आहे.
त्यांचा हा निर्णय योग्य ठरला. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 13 षटकांत 78 धावांची भागीदारी करताच एक वेगळा विक्रम नावावर केला. त्यांनी 2000 च्या आशिया चषक स्पर्धेत पाकिस्तानच्या इम्रार नाझीर आणि सईद अनवर यांच्या नावावर असलेला 74 धावांचा विक्रम मोडला. भारताविरुद्ध बांगलादेशच्या सलामीवीरांनी आशिया चषक स्पर्धेत केलेली ही सर्वोत्तम भागीदारी ठरली.