Join us

Asia Cup: एकाला गर्लफ्रेंडचा फटका, दुसऱ्याला बायकोचा झटका; बांगलादेशच्या त्रिकुटाची स्पर्धेआधीच 'विकेट'

एक खेळाडू गर्लफ्रेंडच्या जाळ्यात अडकला आहे, तर दुसऱ्या खेळाडूला बायकोने चांगलाच इंगा दाखवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2018 14:06 IST

Open in App
ठळक मुद्देआगामी आशिया चषक स्पर्धेपूर्वीच खेळाडूंची विकेट पडली आहे.

नवी दिल्ली : बांगलादेशच्याक्रिकेट संघात नेमके काय चालले आहे, हा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. कारण त्यांच्या तीन खेळाडूंवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यापैकी एक खेळाडू गर्लफ्रेंडच्या जाळ्यात अडकला आहे, तर दुसऱ्या खेळाडूला बायकोने चांगलाच इंगा दाखवला आहे. त्यामुळे आगामी आशिया चषक स्पर्धेपूर्वीच खेळाडूंची विकेट पडली आहे.

बांगलादेशचा मोसादेक हुसेन हा खेळाडू म्हणून गुणी असला तरी त्याच्यावर बायकोने गंभीर आरोप केले आहेत. मोसादेकने बायकोकडून दहा लाख रुपये हुंड्याची मागणी केली. हुंडा मिळणार नाही, हे कळल्यावर त्याने बायकोला मारहाण करायला सुरुवात केली. त्यानंतर त्याच्या पत्नीने मोसादेकविरुद्ध तक्रार केली आहे.

बांगलादेशच्या नासिर हुसेनने तर आपल्या गर्लफ्रेंडबरोबरच्या वैयक्तिक गोष्टी सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. त्यामुळे नासिर चांगला अडचणीत आला आहे. नासिरविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

शब्बीर रेहमानने तर आतापर्यंत बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. शब्बीरने सोशल मीडियावर एका चाहत्याला शिवी घातली होती. त्यानंतर एका चाहत्याबरोबर त्याची मारामारीही झाली होती. त्यानंतर शब्बीरवर 20 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. त्याचबरोबर त्याला बांगलादेशच्या करारामधूनही बाहेर काढण्यात आले होते.

टॅग्स :बांगलादेशक्रिकेट