Join us

Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!

अफगाणिस्तानच्या आडवा आला मेंडिस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2025 23:54 IST

Open in App

SL vs AFG ; Afghanistan Knocked Out Asia Cup Bangladesh Qualify For Super Fours With Sri Lanka Won : कुसल मेंडिसच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने अवघड झालेला सामना अगदी सहज जिंकत 'ब' गटातून सर्वच्या सर्व तीन सामन्यातील विजयासह दिमाखात सुपर फोरमध्ये एन्ट्री मारली आहे. दुसऱ्या बाजूला पराभवासह अफगाणिस्तानच्या संघाचा आशिया चषक स्पर्धेतील प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला आहे. श्रीलंकेच्या विजयामुळे वेटिंगवर असलेल्या बांगलादेशचा संघ ४ गुणांसह सुपर फोरसाठी पात्र ठरला आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यात नेहमीच क्रिकेटच्या मैदानात 'कांटे की टक्कर' पाहायला मिळते. दोन्ही संघातील सामना आणि  'नागिन डान्स' प्रकरण चांगलेच लोकप्रिय आहे. त्यामुळेच  श्रीलंकेचा हा विजय म्हणजे त्यांनी 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशला मदतीचा हात दिल्यासारखे आहे. आता सुपर फोरमध्ये या दोन संघातील लढतीत कोण कुणासमोर 'नागिन डान्स' करणार ते पाहण्याजोगे असेल.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बॅटिंग वेळी अफगाणिस्तानच्या ताफ्यातून मोहम्मद नबीचा धमाका

टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर अवघ्या ७१ धावांवर अफगाणिस्तानचा अर्धा संघ तंबूत परतला होता. पण त्यानंतर मोहम्मद नबीनं २२ चेंडूत ३ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने केलेल्या ६० धावांची दमदार खेळी आणि कर्णधार राशिद खानच्या २३ चेंडूतील २४ धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानच्या संघाने बॅटिंगमधील उणीव भरून काढत संघाच्या धावाफलकावर निर्धारित २० षटकात ८ विकेट्सच्या मोबदल्यात १६९ धावा लावल्या होत्या. 

Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

कुसल मेंडिसनं श्रीलंकेच्या बाजूनं सेट केला सामना 

गोलंदाजी ही अफगाणिस्तानची ताकद आहे. त्यामुळे हा सामना श्रीलंकेला जड जाईल, असे वाटत होते. कमालीच्या फॉर्ममध्ये असलेल्या पथुम निसंकाला अवघ्या ६ धावांवर तंबूचा रस्ता दाखवत अझमतुल्लाह याने संघाला दमदार सुरुवातही करून दिली. कामिल मिशाराच्या रुपात मोहम्मद नबीनं गोलंदाजीत कमाल दाखवत संघाला दुसरे यश मिळवून दिले. या दोन विकेट्स गमावल्यावर श्रीलंकेचा संघ अडचणीत दिसत होता. पण कुसल मैंडिसनं आपल्या भात्यातील खास नजराणा पेश करताना आधी परेरासोबत तिसऱ्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. मग असलंकाच्या साथीनं संघाला शंभरीच्या पार नेत सुपर फोरसाठी आवश्यक नेट रनरेट बांगलादेशपेक्षा उत्तम केले. श्रीलंकेच्या धावफलकावर १०१ धावा लागताच ते सुपर फोरसाठी पात्र ठरले. मग इथून अफगाणिस्तान अन् बांगलादेश यांच्यातील लढाई सुरु झाली. जिंका अन् सुपर फोर लढतीसाठी पात्र ठरा हा एकमेव मार्ग अफगाणिस्तासमोर होता. पण लंकेनं त्यांच्यासमोर डंका वाजवत बांगलादेशचा मार्ग मोकळा केला.

टॅग्स :आशिया कप २०२५