Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?

सुपर फोरमधील सलग दुसऱ्या पराभवासह श्रीलंकेचा यंदाच्या हंगामातील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 00:40 IST2025-09-24T00:34:47+5:302025-09-24T00:40:27+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 PAK vs SL Super Fours 15th Match Pakistan won by 5 wkts Against Sri Lanka Hussain Talat Mohammad Nawaz Shine In Batting After Shaheen Shah Afridi's Fiery Spell Hope For Final But Not Safe | Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?

Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 Asia Cup 2025  Pakistan won by 5 wkts Against Sri Lanka : अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने ग्रुप टॉपर श्रीलंकेला पराभवाचा दणका दिलाय. गोलंदाजीत दमदार कामगिरी केल्यावर धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानकडून हुसेन तलक आणि मोहम्मद नवाझ यांनी दमदार फलंदाजी करत संघाला ५ विकेट्स राखून विजय मिळवून दिला. या विजयासह पाकिस्तानच्या संघाने आशिया चषक स्पर्धेतील फायनल खेळण्याची आपली आस कायम ठेवली आहे. दुसरीकडे सुपर फोरमधील सलग दुसऱ्या पराभवासह श्रीलंकेचा यंदाच्या हंगामातील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

श्रीलंकेचा प्रवास जवळपास संपुष्टात, पाकचा संघ जिंकला तरी धोका कायम!

आशिया चषक स्पर्धीतील 'ब' गटातून दमदार कामगिरी करणारा श्रीलंकन संघ टीम इंडियानंतर फायनलचा दुसरा प्रबळ दावेदार होता. पण आता हा संघ स्पर्धेत टिकणं मुश्किल झालं आहे. दुसरीकडे पाकच्या संघानं श्रीलंकेला जवळपास स्पर्धेबाहेर केलं असलं तरी त्यांचे संकट अजूनही टळलेले नाही. कारण पाकिस्तानच्या संघाने दोन सामन्यातील एका विजयासह २ गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत. या स्पर्धेत त्यांचा फक्त एक सामना उरला आहे. ते सुपर फोरमधील शेवचा सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहेत. जर हा सामना गमावला तर त्यांचा स्पर्धेली प्रवास संपुष्टात येईल.  भारतीय संघाला फायनलचं गाठण्यासाठी बांगलादेश आणि श्रीलंका या दोन्ही संघापैकी एक विजय पुरेसा ठरेल.
 

पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)

पाकच्या ताफ्यातून शाहीन शाह आफ्रिदीचा भेदक मारा; श्रीलंकेकडून कामिंदु मेंडिसचं अर्धशतक

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाकिस्तानचा कर्णधार सलामन अली आगा याने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. स्पर्धेत आतापर्यंत सुमार कामगिरी करणाऱ्या शाहीन आफ्रिदीनं कर्णधाराचा निर्णय़ सार्थ ठरवताना सुरुवातीलाच श्रीलंकेच्या आघाडीला सुरुंग लावता. कामिंदु मेंडिसच्या ५० (४४) अर्धशतकाच्या जोरावर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित २० षटकात  ८ विकेट्सच्या मोबदल्यात १३३ धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून शाहीन शाह आफ्रिदीनं सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. याशिवाय हारिस राउफनं आणि हुसेन तलक यांनी प्रत्येकी २-२ तर अबरार अहमदनं एक विकेट घेतली. 

हसरंगा अन् तीक्षणाने फिरकीची जादू दाखवली, पण शेवटी....

श्रीलंकेच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाने चांगली सुरुवात केली. साहिबजादा फरहान आणि फखर झमान जोडीनं पहिल्या विकेटसाठी ४५ धावांची भागीदारी रचली. सलामी जोडी परतल्यावर श्रीलंकेच्या पाकिस्तानचा संघ हसरंगा अन् तीक्षणाच्या फिरकीच्या जाळ्यात फसला होता. पण हुसेन तलक आणि मोहम्मद नवाझ यांनी आश्वासक खेळी करत १८ षटकातच संघाचा विजय निश्चित केला. श्रीलंकेकडून हसरंगा आणि महेश तीक्षणा जोडीनं प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. याशिवाय दुश्मंथा चमिरा याने एक विकेट घेतली. 

Web Title: Asia Cup 2025 PAK vs SL Super Fours 15th Match Pakistan won by 5 wkts Against Sri Lanka Hussain Talat Mohammad Nawaz Shine In Batting After Shaheen Shah Afridi's Fiery Spell Hope For Final But Not Safe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.