रविवारच्या रात्री प्रत्येक भारतीयाचा श्वास रोखून धरणाऱ्या आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात, टीम इंडियाने पाकिस्तानवर ५ विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे. पराभवाच्या छायेतून भारताला बाहेर काढत, अष्टपैलू खेळाडू शिवम दुबे, तिलकने शेवटच्या षटकापर्यंत किल्ला लढविल्याने संपूर्ण देशात दिवाळी साजरी झाली. या विजयासह भारताने विक्रमी ९व्यांदा आशिया चषकावर आपले नाव कोरले आहे. परंतू हा कप काही भारताच्या हाती लागलेला नाहीय.
पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...
आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले...
नाणेफेकीपासूनच पाकिस्तानचा भारताने अपमान सुरु केला होता. कर्णधार सलमान आगा याच्याशी भारताचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि समालोचक रवी शास्त्री काहीही बोलले नाहीत. अखेर वकार युनूस याने पाकिस्तानी कर्णधाराला प्रश्न विचारले. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच टॉसला दोन सादरकर्ते उपस्थित होते. यानंतर सामना जिंकल्यावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छांचे ट्विट केले. यावर पीसीबी, एसीसी अध्यक्ष असलेले पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी खोचक उत्तर दिले.
"जर युद्ध तुमच्या अभिमानाचे मोजमाप करण्यासाठी मापदंड असेल, तर इतिहासाने पाकिस्तानकडून तुमचा अपमानजनक पराभव आधीच नोंदवला आहे. कोणताही क्रिकेट सामना ते सत्य बदलू शकत नाही. खेळात युद्ध ओढणे केवळ तुमची निराशा दर्शवते आणि खेळाच्या आत्म्याचा अपमान करते.", असे नकवी म्हणाले. यानंतर जे सुरु झाले ते क्रिकेटच्या इतिहासात कधीच झालेले नाही. भारताने नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारण्यास नकार दिला. नकवी अखेर ही ट्रॉफी घेऊन हॉटेलमध्ये पळाले. भारतीय संघाने प्रतिकात्मक ट्रॉफीचे वितरण करून पाकिस्तानींची चांगलीच जिरवली.
IND vs PAK, Asia Cup Final 2025 Match Highlights
यावर आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिकची प्रतिक्रिया आली आहे. भारताने जिंकलेली ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्यांना त्रास होऊ शकतो, असे मलिक म्हणाला. खेळाडूंनी खूप मेहनत घेतली, इतक्या उन्हात खेळले आणि स्पर्धा जिंकली. इतक्या कष्टाचे प्रयोजन काय होते? ट्रॉफी उचलण्यासाठी! आणि तरीही, जिंकल्यानंतर, ते ती घेण्यासाठीही आले नाहीत. एका निकराच्या सामन्यानंतर मिळालेली ही एक मोठी कामगिरी होती. पण त्यांनी संधी गमावली, असे तो म्हणाला आहे.