Join us

पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली...

Asia Cup 2025 Final, Ind vs Pak trophy controversy: भारतीय संघाचा कप्तान सुर्यकुमार यादवने आपली मॅचची फी भारतीय लष्कराला देण्याचे जाहीर करताच तिकडे पाकिस्तानी कप्तानाला मिरच्या झोंबल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 09:45 IST

Open in App

आशिया कपमध्ये अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. हा अंतिम सामना देखील वादग्रस्तच ठरला. पाकिस्तानचा गृहमंत्री, एसीसीची आणि पीसीबीचा अध्यक्ष मोहसिन नकवी याच्या हस्ते भारतीय संघाने ट्रॉफी घेण्यास नकार दिला. बराच वेळ वाट पाहून नकवी कंटाळला, भारतीय संघाने मैदानावरच बसकन मारलेली होती. अखेरीस भारतीय संघ ट्रॉफी न घेताच हॉटेलमध्ये गेला आणि नकवीने भारतीय संघाची ट्रॉफी, मेडल चोरले आणि आपल्यासोबत घेऊन गेला. यानंतरही बऱ्याच घडामोडी घडू लागल्या आहेत. 

भारतीय संघाचा कप्तान सुर्यकुमार यादवने आपली मॅचची फी भारतीय लष्कराला देण्याचे जाहीर करताच तिकडे पाकिस्तानी कप्तानाला मिरच्या झोंबल्या आहेत. त्याने त्याला मिळणारी मॅचची फी भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये मारलेल्या दहशतवाद्यांना व त्यांच्या कुटुंबांना देण्याची घोषणा केली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा म्होरक्या मसूद अजहरचे कुटुंब मारले गेले होते. पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या कुटुंबांना त्याला मिळणारी रक्कम दान करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच आगा हा मसूद अजहरच्या कुटुंबाला हे पैसे देणार आहे. या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला असून, पाकिस्तान संघ दहशतवाद्यांना पाठिंबा देत असल्याची टीका होत आहे.

मसूद अजहरचे सर्व कुटुंब हा हल्ल्यात ठार झाले असून आता तोच एकटा उरला आहे, यामुळे आगाचा हा पैसा अजहरलाच जाणार आहे. या पराभवानंतर पत्रकार परिषदेत बोलताना सलमान अली आगा म्हणाला, "आम्ही आशिया चषकातून कमावलेले पैसे 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मारल्या गेलेल्या पाकिस्तानी नागरिक आणि मुलांच्या कुटुंबीयांना दान करणार आहोत." अनेकांनी याला दहशतवादाचे समर्थन म्हटले आहे.'ऑपरेशन सिंदूर' ही भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात केलेली एक मोठी कारवाई होती. या कारवाईत अनेक दहशतवादी मारले गेले होते. त्यामुळे, आगाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानचा संघ दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभा राहत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. यापूर्वीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये खेळाडूंमधील तणाव आणि वादविवाद पाहायला मिळाले आहेत. मात्र, आता थेट दहशतवाद्यांना मदत करण्याची भाषा वापरल्याने या प्रकरणाला गंभीर वळण लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistani Captain to Donate Match Fee to Terrorist Masood Azhar's Family

Web Summary : Pakistani captain Salman Ali Agha announced he would donate his match fee to the family of Masood Azhar, killed in Operation Sindoor. This sparked controversy, drawing criticism that Pakistan supports terrorism after India's captain donated to Indian army.
टॅग्स :आशिया कप २०२५पाकिस्तानभारत विरुद्ध पाकिस्तानमसूद अजहरदहशतवादी