Asia Cup 2025, BAN vs HK 3rd Match, Tanzim Hasan Sakib vs Babar Hayat : आशिया कप स्पर्धेतील तिसऱ्या टी-२० सामन्यात 'ब' गटातील बांगलादेशच्या संघाने नाणेफेक जिंकून हाँगकाँगच्या संघाला पहिल्यांदा फलंदाजीसाठी निमंत्रित केले. शेख झायेद क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कर्णधार तमीम इक्बालचा निर्णय सार्थ ठरवत बांगलादेशकडून तास्किन अहमदनं हाँगकाँगचा सलामीवीर अंशुमन रथला अवघ्या ४ धावांवर तंबूचा रस्ता दाखवला. त्यानंतर गत टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत हवा करणारा युवा गोलंदाज तंझीम हसन साकिब पिक्चरमध्ये आला. हाँगकाँगचा स्टार बॅटर बाबर हयात याने त्याच्या गोलंदाजीवर एक उत्तुंग षटकार मारला. पण या गोलंदाजाने पुढच्याच चेंडूवर बाबरची हवा काढली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बाबरनं उत्तुंग षटकार मारला, पण दुसऱ्याच चेंडूवर तंझीमनं घेतला बदला
हाँगकाँगच्या संघाने पहिली विकेट गमावल्यावर बाबर हयात फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता असलेल्या हाँगकाँगच्या ताफ्यातील या गड्याने चांगली सुरुवातही केली. पाचव्या षटकात त्याने तंझीमच्या षटकात एक उत्तुंग षटकार मारून आपल्यातील धमक दाखवून दिली. पण त्याचा हा रुबाब फार काळ टिकला नाही. तिसऱ्या चेंडूवर षटकार खल्ल्यावर तंझीम याने चौथ्या चेंडूवर अचूक टप्प्यावर चेंडू टाकत त्याचा त्रिफळा उडवला. ही विकेट आपल्या खात्यात जमा केल्यावर तंझीमनं आक्रमक अंदाजात सेलिब्रेशन करत बाबरला खुन्नस दाखवल्याचेही पाहायला मिळाले. बाबर हयात याने एका षटकाराच्या मदतीने १२ चेंडूत १४ धावांची खेळी केली.
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
गोलंदाजीत तंझीमची हवा
बांगलादेशच्या ताफ्यातील गोलंदाजाने आशिया चषक स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीतील धार दाखवू देत कमालीची गोलंदाजी केली. आपल्या ४ षटकांच्या कोट्यात त्याने २१ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशच्या गोलंदाजाने आशिया कप स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात आपल्या गोलंदाजीतील धार दाखवताना कमालीची गोलंदाजी केली. आपल्या ४ षटकांच्या कोट्यात त्याने २१ धावा खर्च करत २ विकेट्स घेतल्या. तंझीम हा बांगलादेशच्या ताफ्यातील उद्योत्मुख स्टार आहे. २०२४ च्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ११ विकेट्स घेत त्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले होते. याच स्पर्धेत त्याने नेपाळ विरुद्ध ७ धावा खर्च करून ४ विकेट्स घेतल्या होत्या. ही त्याची टी-२० कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी आहे.
Web Title: Asia Cup 2025 Bangladesh vs Hong Kong 3rd Match Tanzim Hasan Sakib Bowled Babar Hayat A Perfect Response After Conceding A Six Watch Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.