कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)

हसरंगानं याच षटकात विकेटचा डाव साधला; दुसरीकडे जाकर अली शेवटपर्यंत खेळला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 22:20 IST2025-09-13T22:16:28+5:302025-09-13T22:20:13+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 BAN vs SL 5th Match Wanindu Hasaranga vs Jaker Ali Ball Hit The Stumps Lights Came On But The Bail Hasn't Fallen Batter Not Out | कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)

कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2025  BAN vs SL, Wanindu Hasaranga vs Jaker Ali, Ball Hit The Stumps But... : बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील पाचवा सामना अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. नाणेफेक जिकून पहिल्यांदा गोलंदाजी करताना श्रीलंकेच्या संघाने बांगलादेशच्या फलंदाजीला सुरुंग लावला. पहिल्या दोन षटकात श्रीलंकन गोलंदाजांनी एकही धाव न देता बांगलादेशच्या संघाला दोन धक्के दिले. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

हसरंगाची फिरकी अन् जाकर अलीला नशिबाची साथ

संघ अडचणीत असताना बांगलादेशच्या संघाकडून जाकर अलीनं संयमी पवित्रा घेत संघाचा डाव सावरणारी खेळी केली. तोही  हसरंगाच्या जाळ्यात सापडला होता. पण नशिबाची साथ मिळाली अन् चेंडू स्टंपला लागूनही तो नाबाद राहिला. नेमकं काय घडलं? इथं जाणून घेऊयात त्याबद्दल सविस्तर 

IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...

चेंडू स्टंपला लागला, लाइट लागली अन् स्पष्ट सिग्नलही मिळाला, पण....

पहिल्या दोन धक्क्यातून सावरत बांगलादेशच्या संघाने १४ व्या चेंडूवर खाते उघडले. श्रीलंकेच्या जलदगती गोलंदाजांनी पहिल्या तिघांना तंबूचा रस्ता दाखवल्यावर फिरकीपटू वानिंदु हसरंगा पिक्चरमध्ये आला. आठव्या षटकात गोलंदाजीला आल्यावर आपल्यया पहिल्याच षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्याने महेदी हसनला पायचित करत विकेट्सच खाते उघडत बांगलादेशच्या संघाला चौथा धक्का दिला. १० व्या षटकात तो दुसरे षटक घेऊन आला. या षटकातील तिसऱ्या चेंडूवर त्याने जाकर अली याला चकवा दिला. चेंडू स्टंपला लागल्यावर लाइटही लागी. पण बांगलादेशच्या सलामीवीराचं नशीबवान ठरला. कारण बेल्स पडली नसल्यामुळे नियमानुसार, तो नाबाद राहिला.

हसरंगानं याच षटकात विकेटचा डाव साधला; दुसरीकडे जाकर अली शेवटपर्यंत खेळला!

जाकर अलीला चकवा देऊनही तो वाचला. पण याच षटकात हसरंगानं  बांगलादेशच्या कॅप्टनला आपल्या जाळ्यात अडकवलं. लिटन दास २८ धावांवर झेलबाद झाला. दुसरीकडे नशीबाची साथ मिळालेल्या बांगलादेशच्या जाकर अलीनं शेवटपर्यंत मैदानात टिकून राहत  ३४ चेंडूत २ चौकाराच्या मदतीने नाबाद ४१ धावांची खेळी करत संघाच्या धावफलकावर १३९ धावा लावण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
 

 

Web Title: Asia Cup 2025 BAN vs SL 5th Match Wanindu Hasaranga vs Jaker Ali Ball Hit The Stumps Lights Came On But The Bail Hasn't Fallen Batter Not Out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.