अर्शदीप सिंगला खुणावतोय 'शतकी' रेकॉर्ड! जे बुमराह-सिराजला जमलं नाही ते सहज साध्य करण्याची संधी

T20I मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 21:06 IST2025-08-09T21:01:51+5:302025-08-09T21:06:04+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2025 Arshdeep Singh Can Become First Indian Bowler To Take 100 T20I Wickets | अर्शदीप सिंगला खुणावतोय 'शतकी' रेकॉर्ड! जे बुमराह-सिराजला जमलं नाही ते सहज साध्य करण्याची संधी

अर्शदीप सिंगला खुणावतोय 'शतकी' रेकॉर्ड! जे बुमराह-सिराजला जमलं नाही ते सहज साध्य करण्याची संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया कप स्पर्धेच्या १७ व्या हंगामातील सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात येणार आहेत. ९ सप्टेंबरपासून रंगणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघााचा पहिला सामना १० सप्टेंबरला नियोजित आहे. आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघात कुणाची वर्णी लागणार ते अजून गुलदस्त्यातच आहे. पण काही नावे जवळपास फिक्स आहेत. त्यातीलच एक चेहरा म्हणजे अर्शदीप सिंग. युएईच्या मैदानात उतरून त्याला मोठा डाव साधण्याची संधी असेल. इथं एक नजर टाकुयात टी-२० तील भारतीय गोलंदाजीतील किंग ठरलेल्या अर्शदीप सिंगला खुणावत असणाऱ्या खास रेकॉर्डबद्दल

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

T20I मध्ये भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज

अर्शदीप सिंग हा टी-२० मधील भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. आशिया कप स्पर्धाही याच प्रकारात खेळवण्यात येणार असल्यामुळे त्याला संघात स्थान मिळणं हे निश्चित आहे. या गोलंदाजाने २०२४ च्या हंगामातील टी-२० वर्ल्ड कप जिंकण्यात मोलाचा वाटा उचलला होता. आता आशिया कप स्पर्धेत त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल.

रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल

'शतकी' डाव साधण्याची संधी

पंजाबी गोलंदाजानं आतापर्यंतच्या आपल्या टी-२० कारकिर्दीत ६३ सामन्यात ९९ विकेट्स घेतल्या आहेत. हा आंतरराष्ट्रीय टी-२० मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आहे. आणखी एक विकेट आपल्या खात्यात जमा करताच तो क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेेटमध्ये शंभर विकेट्सचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरेल. तो युएईविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात  हा डाव साध्य करू शकतो. 

बुमराह टॉप ५ मध्ये आहे, पण...

आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत  जसप्रीत बुमराह टॉप ५ मध्ये आहे. पण त्याने अद्याप ९० विकेट्सचा आकडाही गाठलेला नाही. बुमराहनं ७० सामन्यातील ६९ डावात ८९ विकेट्स घेतल्या आहेत.  भुवनेश्वर कुमारनं ८७ सामन्यात ९० विकेट्स घेतल्या असून हार्दिक पांड्या ११४ सामन्यात ९४ विकेट्स आणि युझवेंद्र चहलनं ८० सामन्यात ९६ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे.

Web Title: Asia Cup 2025 Arshdeep Singh Can Become First Indian Bowler To Take 100 T20I Wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.