Join us  

पाकिस्तानविरुद्ध हरू, अशी भारताला भीती वाटतेय का? शेजारच्या देशातून BCCIला थेट सवाल

Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सुपर ४ सामन्यानंतर, उर्वरित स्पर्धेसाठी सर्व संघ  कोलंबोत दाखल होतील.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 5:44 PM

Open in App

Asia Cup 2023 India vs Pakistan : आशिया चषक २०२३ मध्ये पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील पहिल्या सुपर ४ सामन्यानंतर, उर्वरित स्पर्धेसाठी सर्व संघ  कोलंबोत दाखल होतील. आशिया चषक स्पर्धेतील सुपर ४ चे सर्व सामने कोलंबो येथेच होतील असा निर्णय आशियाई क्रिकेट परिषदेने ( ACC) मंगळवारी घेतला.  वृत्तानुसार, कोलंबोमध्ये पावसाची शक्यता असल्यामुळे सुपर ४ चे सामने हंबनटोटा येथे हलवले जाऊ शकतात, असे ACCने सर्व संलग्न संघटनांना एका पत्रात म्हटले होते. पण, काही तासांनंतर हे सामने कोलंबोमध्येच राहणार असल्याची माहिती देण्यात आली. 

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB ) माजी प्रमुख नजम सेठी ( Najam Sethi) यांनी आरोप केला आहे, की टीम इंडिया आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( BCCI) यांना पाकिस्तानकडून पराभूत होईल अशी भीती वाटत आहे आणि त्यामुळेच त्यांनी सामने कोलंबोबाहेर हलवण्यास आक्षेप घेतला आहे. आशिया चषक २०२३ च्या सुपर ४ चे सामने पावसाच्या शक्यतेमुळे कोलंबोहून हंबनटोटा येथे हलवावेत, असे अहवालात सुचवण्यात आले  होते. या अहवालांना वाव मिळाला असताना, आशिया क्रिकेट परिषदेकडून हे सामने कोलंबोबाहेर हलवले जाणार नाहीत, असे सांगण्यात आले.  

 “बीसीसीआय/एसीसीने आज पीसीबीला कळवले की त्यांनी पावसाच्या अंदाजामुळे पुढील भारत-पाकिस्तान सामना कोलंबोहून हंबनटोटा येथे हलवण्याचा निर्णय घेतला आहे. एका तासाच्या आत त्यांनी आपला विचार बदलला आणि कोलंबो हे ठिकाण घोषित केले. काय चालू आहे? भारताला पाकिस्तानशी खेळण्याची आणि हरण्याची भीती वाटते का? पावसाचा अंदाज बघा,” असे सेठी यांनी ट्विट केले आहे. 

भारत-पाकिस्तान यांच्यातला साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर सुपर ४ मध्ये १० सप्टेंबरला पुन्हा उभय संघ समोरासमोर येणार आहेत. पण, याही सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल असा अंदाज आहे. आशिया चषक २०२३ हायब्रिड मॉडेलनुसार खेळवला जात आहे आणि पाकिस्तान व श्रीलंका यांच्याकडे यजमानपदाचा मान दिला गेला आहे.  

टॅग्स :एशिया कप 2023भारत विरुद्ध पाकिस्तान
Open in App