आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video 

Asia Cup 2023 Super 4 : भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2023 06:56 PM2023-09-07T18:56:55+5:302023-09-07T19:00:46+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2023 : Gym session of Rohit Sharma & Virat Kohli, Indian Players getting ready for Super 4, Watch Video  | आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video 

आराराsss राss राss खरतनाक! टीम इंडियाचा वर्क आऊट पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये घबराट, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2023 Super 4 : भारत-पाकिस्तान यांच्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. आशिया चषकातील साखळी सामन्यातील IND vs PAK लढत पावसामुळे रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता सुपर ४ मध्ये India vs Pakistan रविवारी भिडणार आहेत. सुपर ४ मधील पहिल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशला नमवले आहे आणि आज ते कोलंबो येथे दाखल झाले आहेत. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी भारतीय संघाने आज नेट्समध्ये कसून सराव केला. KL Rahul च्या पुनरागमनामुळे भारताची मधली फळी आणखी मजबूत झाली आहे. BCCI ने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या जिम सेशनचा व्हिडीओ पोस्ट केला अन् तो पाहून प्रतिस्पर्ध्यांमध्ये नक्की घबराट पसरली असेल, परंतु चाहते आनंदीत झाले आहेत.


भारत-पाकिस्तान यांच्यातला साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द झाला होता. रोहित शर्मा, विराट कोहली, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर या आघाडीच्या फलंदाजांनी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर गुडघे टेकले होते. इशान किशन व हार्दिक पांड्या यांच्या खेळीने भारताला सावरले होते. पण, भारताच्या डावानंतर पावसाने हजेरी लावली अन् मॅच रद्द झाली. नेपाळविरुद्ध भारताने विजय मिळवला, परंतु येथे गोलंदाजांचे अपयश लपले नाही. नेपाळसारख्या संघाने भारताविरुद्ध २३० धावा उभ्या केल्या. आज विराट व रोहितने सराव सत्रातून विश्रांती घेतलेली पाहायला मिळाले. दुखापतीतून सावरणारा लोकेश राहुल नेट्समध्ये चांगली फटकेबाजी करताना दिसला. तर गिल, हार्दिक, श्रेयस, सुर्यकुमार, शार्दूल यांनीही फलंदाजी केली.  पण, विराट, रोहित, इशान, शार्दूल, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी व कुलदीप यादव यांनी जिम सेशनमध्ये चांगलीच कसरत केली. 

  

भारताचं सुपर ४ मधील वेळापत्रक ( Schedule of Indian team in Super 4 ) 
१० सप्टेंबर - वि. पाकिस्तान
१२ सप्टेंबर - वि. श्रीलंका
१५ सप्टेंबर - वि. बांगलादेश
 
अन्य लढती
६ सप्टेंबर - पाकिस्तान वि. बांगलादेश ( पाकिस्तानचा ७ विकेट्स राखून विजय) 
९ सप्टेंबर - श्रीलंका वि. बांगलादेश
१४ सप्टेंबर- पाकिस्तान वि. श्रीलंका 

Web Title: Asia Cup 2023 : Gym session of Rohit Sharma & Virat Kohli, Indian Players getting ready for Super 4, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.