Asia Cup 2022, SL vs BAN : Shakib Al Hasanने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये घडविला इतिहास!; जगात केवळ एका खेळाडूला जमलेली अशी अष्टपैलू कामगिरी

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : श्रीलंकेने करो वा मरो सामन्यात बांगलादेशविरुद्ध सध्यातरी चांगली गोलंदाजी केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 08:45 PM2022-09-01T20:45:30+5:302022-09-01T20:46:16+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, SL vs BAN : Dwayne Bravo and Shakib Al Hasan are the only cricketers to have 6000+ runs & 400+ wickets in T20 history. | Asia Cup 2022, SL vs BAN : Shakib Al Hasanने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये घडविला इतिहास!; जगात केवळ एका खेळाडूला जमलेली अशी अष्टपैलू कामगिरी

Asia Cup 2022, SL vs BAN : Shakib Al Hasanने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये घडविला इतिहास!; जगात केवळ एका खेळाडूला जमलेली अशी अष्टपैलू कामगिरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, Sri Lanka vs Bangladesh : श्रीलंकेने करो वा मरो सामन्यात बांगलादेशविरुद्ध सध्यातरी चांगली गोलंदाजी केली आहे. बांगलादेशच्या धावांची सरासरी ८च्या आसपास असली तरी त्यांच्या ४ महत्त्वाच्या विकेट्स श्रीलंकेने माघारी पाठवल्या आहेत. त्यात कर्णधार शाकिब अल हसन ( Shakib Al Hasan) याचाही समावेश आहे. शाकिब २२ चेंडूंत २४ धावा करून बाद झाला, परंतु त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम केला. ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये फक्त एकाच खेळाडूला अशी अष्टपैलू कामगिरी करता आली होती. 

यूएईत आतापर्यंत खेळलेल्या सर्व ६ ट्वेंटी-२० सामन्यांत बांगलादेशला पराभव पत्करावा लागला आहे. यापैकी एकदाच त्यांनी १५० पेक्षा अधिक ( ४ बाद १७१ धावा वि. श्रीलंका, ऑक्टोबर २०२१) धावा केल्या आहेत. २०२२मध्ये श्रीलंका ( १२ सामने) व बांगलादेश ( ९) यांना केवळ दोनच विजय मिळवता आले आहेत. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला अन् तिसऱ्याच षटकात त्यांना यश मिळाले. सब्बीर रहमान ( ५) असिथा फर्नांडोने चालते केले. मेहिदी हसन मिराज व कर्णधार शाकिब अल हसन यांनी त्यानंतर बांगलादेशचा डाव सावरला. पण, वनिंदू हसरंगा त्याच्या पहिल्याच षटकात मेहिदी हसनचा ( ३८) त्रिफळा उडवला. मुश्फीकर रहिम ( ४) याला चमिका करुणारत्नेनं बाद करून तिसरा धक्का दिला.

महिश थिक्षानाने श्रीलंकेला मोठं यश मिळवून दिलं. त्याने शाकिबचा ( २४) त्रिफळा उडवून बांगलादेशची अवस्था ४ बाद ८७ अशी केली. बांगलादेशने विकेट गमावल्या असल्या तरी त्यांचा धावांचा वेग साडेसातच्या सरासरीने सुरू होता.


ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ६०००+ धावा आणि ४००+ विकेट्स घेणारा शाकिब दुसरा खेळाडू ठरला. त्याने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये ३६९ सामन्यांत ६००९ धावा व ४१९ विकेट्स घेतल्या आहेत. विंडीजचा ड्वेन ब्राव्हो ५४९ सामन्यांत ६८७१ धावा व ६०५ विकेट्ससह या विक्रमात अव्वल स्थानी आहे. 

Web Title: Asia Cup 2022, SL vs BAN : Dwayne Bravo and Shakib Al Hasan are the only cricketers to have 6000+ runs & 400+ wickets in T20 history.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.