Asia Cup 2022, PAK vs HK : हाँगकाँगने बाबर आजमचं टेंशन वाढवलं; करो वा मरो सामन्यात घेतला मोठा निर्णय

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : भारतीय संघाकडून सपाटून मार खाणारे दोन संघ पाकिस्तान व हाँगकाँग आज आशिया चषक स्पर्धेत आव्हान टीकवण्यासाठी एकमेकांना भिडणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 07:07 PM2022-09-02T19:07:57+5:302022-09-02T19:08:25+5:30

whatsapp join usJoin us
Asia Cup 2022, PAK vs HK : Hong King won the toss and decided to bowl first, no change in both team | Asia Cup 2022, PAK vs HK : हाँगकाँगने बाबर आजमचं टेंशन वाढवलं; करो वा मरो सामन्यात घेतला मोठा निर्णय

Asia Cup 2022, PAK vs HK : हाँगकाँगने बाबर आजमचं टेंशन वाढवलं; करो वा मरो सामन्यात घेतला मोठा निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Asia Cup 2022, Pakistan vs HongKong : भारतीय संघाकडून सपाटून मार खाणारे दोन संघ पाकिस्तान व हाँगकाँग आज आशिया चषक स्पर्धेत आव्हान टीकवण्यासाठी एकमेकांना भिडणार आहे. आजच्या सामन्यातील विजेता संघ सुपर ४ मध्ये प्रवेश करेल, तर दुसऱ्याचा प्रवास इथेच संपेल. भारताविरुद्ध पाकिस्तानला १४७ धावा करता आल्या होत्या, तर हाँगकाँगने १९२ धावांच्या प्रत्युत्तरात १५० धावांपर्यंत मजल मारली होती. त्यामुळे आजच्या सामन्यात धक्कादायक निकाल लागेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. आज पाकिस्तान जिंकल्यास रविवारी पुन्हा एकदा India vs Pakistan यांच्यातला मेगा ब्लाकबस्टर पाहायला मिळेल.

कर्णधार बाबर आजम पहिल्या सामन्यात अपयशी ठरला होता आणि मोहम्मद रिझवानने एकाकी खिंड लढवली होती. आजच्या सामन्यात हाँगकाँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेताना पाकिस्तानच्या अडचणी वाढवल्या. दोन्ही संघांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल केलेला नाही. या खेळपट्टीवर प्रथम फलंदाजी करणे तितकं सोपं नाही आणि हाँगकाँगने हा निर्णय घेत पाकिस्तानचं टेंशन वाढवलं आहे.


हाँगकाँग - यासिम मुर्ताझा, निझाकत खान, बाबर हयात, किंचित शाह, ऐजाझ खान, स्कॉट मॅकेची, झीशान अली, हरून अर्षद, एहसान खान, मोहम्मद घाझनफार, आयुष शुक्ला ( Hong Kong Playing XI: Yasim Murtaza, Nizakat Khan (c), Babar Hayat, Kinchit Shah, Aizaz Khan, Scott McKechnie (wk), Zeeshan Ali, Haroon Arshad, Ehsan Khan, Mohammad Ghazanfar, Ayush Shukla) 

पाकिस्तान - बाबर आजम, मोहम्मद रिझवान, फाखन जमान, इफ्तिखार अहमद, खुशदील शाह, आसिफ अली, शाबाद खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरीस रौफ, शाहनवाज दहानी ( Pakistan Playing XI: Babar Azam (c), Mohammad Rizwan (wk), Fakhar Zaman, Iftikhar Ahmed, Khushdil Shah, Asif Ali, Shadab Khan, Mohammad Nawaz, Naseem Shah, Haris Rauf, Shahnawaz Dahani) 


 

Web Title: Asia Cup 2022, PAK vs HK : Hong King won the toss and decided to bowl first, no change in both team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.