Join us  

कोरोनामुळे मोठी स्पर्धा रद्द झाली, भारत-पाकिस्तान सामन्याची प्रतीक्षा लांबली!

कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा क्रिकेट स्पर्धा रद्द किंवा स्थगित होण्याचे सत्र सुरू झाले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 9:49 AM

Open in App

भारतात सुरू असलेली इंडियन प्रीमिअर लीग ( IPL 2021) स्थगित करण्याचा निर्णय घेतला गेला. बीसीसीआयनं खेळाडूंसाठी तयार केलेला सुरक्षित बायो-बबलचा फुगा कोरोनानं भेदला अन् एकामागून एक खेळाडू पॉझिटिव्ह झाले. त्यात भारतात होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या आयोजनावरही प्रश्नचिन्ह आहे. ही स्पर्धा UAEला खेळवण्याच्या पर्यायाचा विचार सुरू झाला आहे. त्यात या व्हायरसमुळे आणखी एक मोठी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे आणि त्याचा सर्वात मोठा फटका भारत-पाकिस्तान या देशांतील चाहत्यांना बसला आहे. AB de Villiers बद्दल वाढला आदर; आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये न परतण्याचा का घेतला निर्णय?, मार्क बाऊचरनं दिलं उत्तर

कोरोना व्हायरसमुळे यंदाही आशिका चषक ट्वेंटी-२० स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यात श्रीलंकेत ही स्पर्धा होणार होती, परंतु श्रीलंकेतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे तेथील प्रशासानं हा मोठा निर्णय घेतला आहे. ( The Asia Cup Twenty20 cricket tournament stands cancelled due to the wake of the Covid-19 pandemic). गेल्यावर्षीही कोरोनामुळेह ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती आणि सहभागी सदस्यांच्या व्यग्र वेळापत्रकामुळे ती पुढे घेताच आली नाही. गतवर्षी ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची पूर्वतयारी म्हणून सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार होती. पण, ऑस्ट्रेलियात होणारा वर्ल्ड कपच रद्द करावा लागला आणि त्यानंतर बीसीसीआयनं त्या कालावधीत आयपीएलचे १३वे पर्व यूएईत खेळवण्याचा निर्णय घेतला. शाहरूख खानच्या संघानं घेतला मोठा निर्णय; भारतीय खेळाडूसह चार जणांना केलं रिलीज!

दरम्यान, ही स्पर्धा रद्द झाल्याचे अधिकृत वृत्त अद्याप आलेले नाही. पण, श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अॅश्ली डी सिल्व्हा यांनी यंदा ही स्पर्धा खेळवणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण आशियात कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, शिवाय श्रीलंकेत एवढ्या संघांची राहण्याची सोय करणे सद्यस्थितीत अवघड आहे, त्यामुळे स्पर्धा घेणे अवघड आहे. २०२३च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचे संकेतही डी सिल्व्हा यांनी दिले.  भारतीय महिला क्रिकेटपटूच्या आईचा कोरोनाशी संघर्ष; उपचारासाठी विराट कोहलीनं केली 6.77 लाखांची मदत

श्रीलंकेनं बुधवारी १० दिवसांसाठी परदेशातून येणाऱ्या सर्व विमानसेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर वन डे मालिकेसाठी गेला आहे. जूलै महिन्यात श्रीलंका-भारत यांच्यात तीन वन डे व तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे.   

टॅग्स :एशिया कपश्रीलंका