Join us

Asia Cup 2018 : रवींद्र जडेजा का बदलतोय सतत हेअर स्टाईल, ऐका त्याच्याच तोंडून 

Asia Cup 2018: पंधरा महिन्यानंतर वन डे संघात पदार्पण करणाऱ्या रवींद्र जडेजाने शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेत आपली छाप पाडली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2018 15:51 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : पंधरा महिन्यानंतर वन डे संघात पदार्पण करणाऱ्या रवींद्र जडेजाने शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेत आपली छाप पाडली. भारताच्या या फिरकीपटूने सुपर फोर गटातील बागंलादेशविरुद्धच्या लढतीत सर्वाधिक चार विकेट घेत दमदार पुनरागमन केले. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने विजयाचा पाया रचला.  या पुनरागमनाबरोबरच त्याच्या नव्या लूकचीही चांगलीच चर्चा रंगली. 

बांगलादेशविरुद्ध त्याने 10 षटकांत 29 धावांत 4 विकेट घेतल्या. तब्बल चार वर्षांनंतर त्याने तीनहून अधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला. 6 जुलै 2017मध्ये जडेजा अखेरचा वन डे सामना खेळला होता. त्याने 11 ऑक्टोबर 2014 मध्ये वेस्ट इंडीजविरुद्ध 44 धावांत 3 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतरची आजची त्याची सर्वोत्तम गोलंदाजी आहे. शुक्रवारी झालेल्या सामन्यात त्याच्या नव्या हेअर स्टाईलनेही सर्वांचे लक्ष वेधले. सामन्यानंतर या नव्या हेअर स्टाईलबाबत संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी विचारले असता काय म्हणाला जडेजा ते ऐका... 

टॅग्स :आशिया चषकरवींद्र जडेजा