Join us

Asia cup 2018 : कोण आहे टीम इंडियाचा नवा भिडू खलिल अहमद?

संघात खलील अहमद हा एक नवीन चेहरा दिसला आणि बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या. कारण आतापर्यंत या खलीलचे नाव कधीही प्रकाशझोतात आलं नव्हतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 13:59 IST

Open in App
ठळक मुद्देहा खलील नेमका कोण आणि संघात कसा आला, असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झाले आहेत.

नवी दिल्ली, Asia cup 2018 : भारताची आशिया चषकासाठी निवड झाली, विराट कोहली संघा नसणं हे काहीसं ठरलेलं होतं. पण संघात खलील अहमद हा एक नवीन चेहरा दिसला आणि बऱ्याच जणांनी भुवया उंचावल्या. कारण आतापर्यंत या खलीलचे नाव कधीही प्रकाशझोतात आलं नव्हतं. त्यामुळे हा खलील नेमका कोण आणि संघात कसा आला, असे प्रश्न बऱ्याच जणांच्या मनात उपस्थित झाले आहेत.

 

खलील हा राजस्थानचा अष्टपैलू खेळाडू. उजव्या हाताने फलंदाजी आणि डावखुरा गोलंदाजी करणारा. खलीलने 2016 साली भारताच्या 19-वर्षांखालील संघात स्थान मिळवले होते त्यानंतर 2016-17 साली राजस्थानमधील आंतरराज्य ट्वेन्टी-20 स्पर्धेत तो खेळताना दिसला. 2017 साली त्याने राजस्थानकडून रणजी करंडकामध्येही पदार्पण केले.

खलीलला आतापर्यंत चमकदार किंवा भारतीय संघात स्थान मिळवावे अशी चमकदार कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे त्याचे नाव भारतीय संघात पाहिल्यावर, खलील नेमका कोणत्या कामगिरीच्या जीवावर संघात आला या प्रश्नांचे उत्तर मिळत नाही.

टॅग्स :आशिया चषकक्रिकेटविराट कोहली