ठळक मुद्देरोहित शर्माने सरावाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे
मुंबई : काही दिवसांमध्ये आता आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी भारताचे कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे. आशिया चषकासाठीरोहित शर्मा फलंदाजीचा सराव करतो आहे. यावेळी त्याला सराव करताना टिप्स दिल्या आहेत त्याला फिरकीपटू युजवेंद्र चहलने. हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसला असेल, पण ही गोष्ट खरी आहे.
रोहित शर्माने सरावाचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे
 View this post on Instagram
रोहितने आपला फलंदाजीचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. रोहितचा हा व्हिडीओ चहलने पाहिला. या व्हिडीओवर " डिफेन्स करायचा नाही, चेंडू उडवून लावायचा " अशी कमेंट चहलने केली आहे.