Join us  

Asia Cup 2018: ... जेव्हा सख्खे मित्र होतात पक्के वैरी

या दोघांमधला एक फिरकीपटू तर दुसरा फलंदाज आणि यष्टीरक्षक.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 9:37 PM

Open in App
ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ते एकाच संघातून खेळत होते. एकमेकांचे चांगले मित्र होते. पण काही महिन्यांनंतर हे सख्खे मित्र पक्के वैरी झाल्याचे पाहायला मिळाले.

दुबई, आशिया चषक 2018, भारत विरुद्ध अफगाणिस्तान : काही दिवसांपूर्वी ते एकाच संघातून खेळत होते. एकमेकांचे चांगले मित्र होते. पण काही महिन्यांनंतर हे सख्खे मित्र पक्के वैरी झाल्याचे पाहायला मिळाले.

आयपीएल सुरु असताना हे दोन्ही खेळाडू एकाच संघात होते. किंग्ज इलेव्हन पंजाब हा त्यांचा संघ. या दोघांमधला एक फिरकीपटू तर दुसरा फलंदाज आणि यष्टीरक्षक. त्यामुळे जेव्हा तो गोलंदाजीला यायचा तेव्हा यष्टीरक्षक त्याचा सर्वात जवळचा मित्र होता. कारण फलंदाज कसा खेळतोय आणि त्याला कसा चेंडू टाकायला हवा, हे यष्टीरक्षक गोलंदाजाला नेहमीच सांगत असतो.

आता आयपीएल संपले. आशिया चषक स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत हे मित्र वैरी असल्याचेच दिसून आले. मंगळवारी झालेल्या सामन्यात हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकले होते. आणि दोघांनीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट आहे भारताचा लोकेश राहुल आणि अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमान यांची. 

टॅग्स :आशिया चषककिंग्ज इलेव्हन पंजाब