Join us

Asia Cup 2018 : सानिया मिर्झासाठी पती शोएब मलिकचा नवा लुक

Asia Cup 2018 : पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 14:04 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018: पाकिस्तानचा क्रिकेट संघ आशिया चषक स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिराती येथे दाखल झाला आहे. पाकिस्तानचा संघ सध्या चांगल्या फॉर्मात असून 2012नंतर पुन्हा आशिया चषक उंचावण्यासाठी खेळाडू आतुर आहेत. त्यासाठी पाकिस्तानच्या खेळाडूंनी शुक्रवारी कसून सराव केला. माजी कर्णधार शोएब मलिकने सरावातून वेळ काढत भारतीय संघ सराव करत असलेल्या ठिकाणी हजेरी लावली. त्याने भारताच्या चमूत एन्ट्री घेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भेट घेतली. त्यामुळे दिवसभर त्याचीच चर्चा रंगली. मात्र, आता एका ट्विटमुळे तो चर्चेत आला आहे. शनिवारी त्याने ट्विटरवर एक 19 सेकंदाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यात त्याने पत्नी सानिया मिर्झाला सप्राईझ दिले आहे. भारताची टेनिस सम्राज्ञी सानिया गर्भवती आहे. महिन्याभरात तिला बाळ होणार आहे. पण, आशिया चषक स्पर्धेमुळे शोएबला तिच्याजवळ थांबता आले नाही. मात्र, त्याला सानियाची खूप आठवण येत आहे. त्याने तसा संदेश सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यासोबत त्याने सानियाला सप्राईझ लुकची भेट दिली आहे. कसा आहे हा लुक पाहा हा व्हिडिओ... सानियानेही त्याची ही पोस्ट रिट्विट केली आहे. त्याच्या या नव्या लुकची स्तुति केली आहे. 

टॅग्स :सानिया मिर्झाशोएब मलिकपाकिस्तानआशिया चषक