दुबई, आशिया चषक 2018 : भारताच्या सलामीवर शिखर धवननेआशिया चषक स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत हाँगकाँगविरुद्ध शतकी खेळी केली. वन डे कारकिर्दीतील त्याचे हे 14वे शतक ठरले. धवनने 120 चेंडूंत 15 चौकार आणि 2 षटकार खेचून 127 धावा चोपल्या. सहा महिन्यांनंतर त्याने वन डेतील पहिले शतक झळकावले आणि युवराज सिंगच्या शतकांची बरोबरी केली.
शिखरने
युवराज सिंगच्या 14 शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये धवन सहाव्या स्थानी आहे. त्याला वीरेंद्र सेहवागच्या (15) शतकांची बरोबरी करण्यासाठी एका शतकाची आवश्यकता आहे. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर ( 49), विराट कोहली ( 35), सौरव गांगुली ( 22) आणि रोहित शर्मा ( 18) आघाडीवर आहेत.
सर्वात जलद 14 शतक झळकावणारा तो चौथा फलंदाज ठरला. त्याने 105 डावांत ही कामगिरी केली. या क्रमवारीत दक्षिण आफ्रिकेचा हशीम आमला आघाडीवर आहे. त्याने 84 डावांत 14 शतक झळकावली होती. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर ( 98) आणि भारताचा विराट कोहली ( 103) यांचा क्रमांक येतो.