दुबई, आशिया चषक 2018 : भारताने शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर गटात बांगलादेशवर 7 विकेट राखून विजय मिळवला. रवींद्र जडेजाने 29 धावांत 4 विकेट घेतल्या, तर रोहित शर्माच्या 83 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. पण, या सामन्यात चार झेल टिपणाऱ्या आणि 40 धावा करणाऱ्या शिखर धवनने एका विक्रमाशी बरोबरी केली आहे.
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या एका वन डे सामन्यात चार झेल टिपणारा धवन हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. कोणत्याही वन डे सामन्यात चार झेल टिपणारा धवन हा भारताचा सातवा खेळाडू ठरला. त्याने 1985 मध्ये सुनील गावस्कर यांच्या विक्रमाची बरोबरी केली.
वन डे सामन्यात चार झेल टिपणारे खेळाडूसुनील गावस्कर वि. पाकिस्तान, शारजा 1985
मोहम्मद अझरुद्दीन वि. पाकिस्तान, टोरँटो, 1997
सचिन तेंडुलकर वि. पाकिस्तान, ढाका, 1998
राहुल द्रविड वि. वेस्ट इंडीज, टोरँटो, 1999
मोहम्मद कैफ वि. श्रीलंका, जोहान्सबर्ग, 2003
व्ही. व्ही. एस. लक्ष्मण वि. झिम्बाब्वे, पर्थ, 2004
शिखर धवन वि. बांगलादेश, दुबई, 2018