Join us

Asia Cup 2018 : भारताच्या विजेतेपदाचे रहस्य उलगडले, पाहा हा व्हिडीओ

केदार यावेळी स्नायूंच्या दुखापतीमुळे हैराण होता. पण भारताला विजय मिळवून देण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये परतलेला केदार पुन्हा एकदा मैदानावर उतरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2018 17:43 IST

Open in App
ठळक मुद्देअखेरच्या षटकात भारताची नेमकी रणनीती काय होती, केदार जाधववर कुणाचा किती विश्वास होता, हे सारे या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते.

दुबई, आशिया चषक 2018  : आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने अखेरच्या चेंडूवर विजय मिळवला. बांगलादेशविरुद्धच्या अटीतटीच्या या सामन्यात भारताने नेमका कसा विजय मिळवला, अखेरच्या षटकात भारताची नेमकी रणनीती काय होती, केदार जाधववर कुणाचा किती विश्वास होता, हे सारे या व्हिडीओमध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकते.

हा पाहा विजयाचं कोडं उलगडणारा खास व्हिडीओ

अखेरच्या षटकात केदारबरोबर कुलदीप यादव फलंदाजी करत होता. केदार यावेळी स्नायूंच्या दुखापतीमुळे हैराण होता. पण भारताला विजय मिळवून देण्यासाठी पॅव्हेलियनमध्ये परतलेला केदार पुन्हा एकदा मैदानावर उतरला आणि अखेरच्या चेंडूचा सामना करत त्याने संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :आशिया चषककेदार जाधवकुलदीप यादव