Join us

Asia cup 2018 : भारत-पाकिस्तान लढतीपूर्वी सानिया मिर्झाने घेतला 'हा' निर्णय 

Asia Cup 2018: भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. दोन्ही देशांचे चाहते क्रिकेट युद्धासाठी सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर तर हे युद्ध जरा जोरातच पेटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 13:03 IST

Open in App

हैदराबाद, आशिया चषक 2018 : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना अवघ्या काही तासात सुरू होणार आहे. दोन्ही देशांचे चाहते क्रिकेट युद्धासाठी सज्ज झाले आहेत. सोशल मीडियावर तर हे युद्ध जरा जोरातच पेटले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटमधील कोणत्याही सामन्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मनस्ताप टेनिसपटू सानिया मिर्झाला सहन करावा लागतो. त्यामुळेच आजच्या लढतीचा निकाल कोणाच्याही बाजूने लागला, तरी सानियाला त्यात रस नाही. म्हणूनच तिने सामन्याच्या 24 तासापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या स्टार टेनिसपटूने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शोएब मलिकशी लग्न केले आहे. तो सध्या संयुक्त अरब अमिराती येथे आशिया चषक स्पर्धेसाठी पाकिस्तान संघासोबत आहे. काही तासांत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू होईल आणि नेटिझन्सकडून पुन्हा एकदा सानियाला टार्गेट केले जाईल. त्यामुळे गर्भवती असलेल्या सानियाने कोणत्याही प्रकारचा मनस्ताप टाळण्यासाठी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

''भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याला 24 तासांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी सोशल मीडियापासून दूर राहिलेलेच बरे. जेणेकरून त्या निरर्थक चर्चांचा मनस्ताप होणार नाही. मी गर्भवती आहे आणि मला एकटीला राहूद्या. हा केवळ क्रिकेट सामना आहे, हे लक्षात ठेवा,'' असे सानियाने ट्विट केले आहे.  2017च्या आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत हे दोन्ही संघ अखेरचे एकमेकांसमोर आले होते. त्यामुळे जवळपास वर्षभरानंतर भारत विरुद्ध पाकिस्तान लढत होणार आहे.  

टॅग्स :आशिया चषकसानिया मिर्झाभारत विरुद्ध पाकिस्तान