Join us  

Asia cup 2018 : भारत- पाकिस्तान सामना पाहण्यासाठी पंतप्रधानांची उपस्थिती? 

Asia cup 2018: भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. या सामन्याची क्रिकेट वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 10:25 AM

Open in App

दुबई, आशिया चषक २०१८ : भारत आणि पाकिस्तान हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आज आशिया चषक स्पर्धेत एकमेकांसमोर उभे टाकले आहेत. या सामन्याची क्रिकेट वर्तुळात बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे. केवळ सामान्य क्रिकेट चाहतेच नव्हे तर सेलेब्रिटीनांही या सामन्याची उत्सुकता आहे. म्हणूनच की काय पाकिस्तानचे नवनिर्वाचित पंतप्रधान इम्रान खान हे या सामन्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 

( Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनीला पाकिस्तान एवढा का घाबरतो, जाणून घ्या)

पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान हे सध्या संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळे ते आज होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. तसे वृत्त पाकिस्तानच्या प्रसारमाध्यमांनी दिले आहे. इम्रान यांच्याबद्दल पाकिस्तानचा कर्णधार सर्फराज अहमदला विचारले असता तो म्हणाला,"भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांत इम्रान खान यांचे चाहते आहेत. त्यामुळे त्यांची उपस्थिती दोन्ही देशांच्या चाहत्यांचा उत्साह वाढवणारी ठरेल. ते पंतप्रधान म्हणून हजर राहणार असल्याने आमचे मनोबल अधिक उंचावणार आहे. त्यांच्या उपस्थितीने पाकिस्तानी खेळाडूंना नेहमी प्रेरणा मिळाली आहे." 

( Asia cup 2018 : रोहित शर्माला पाकिस्तानविरुद्ध विक्रमाची संधी, विराटला मागे सोडणार )

२००६ नंतर प्रथमच उभय संघ संयुक्त अरब अमिराती येथे एकमेकांना भिडणार आहेत. २०१७ च्या चॅम्पियन्स चषक स्पर्धेच्या अंतिम लढतीत हे संघ समोरासमोर आले होते आणि त्यात पाकिस्तानने बाजी मारली होती. १९८० च्या दशकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या अनेक सामन्यांत इम्रान खान यांनी पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

 

टॅग्स :आशिया चषकभारतपाकिस्तान