Join us  

Asia Cup 2018 : भारताविरुद्ध पाकिस्तानचे पारडे 'या' गोष्टींमुळे जड

पाकिस्तानने अमिरातीमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. त्यामुळे या गोष्टींचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2018 6:14 PM

Open in App
ठळक मुद्देहाँगकाँगबरोबर सामना झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशीच भारताला पाकिस्तानबरोबर सामना खेळावा लागणार आहे. हा खरेतर भारतीय संघावर अन्याय आहे.

मुंबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक स्पर्धेत साऱ्यांच्या नजरा आहेत त्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यावर. हा सामना बुधावारी खेळवला जाणार आहे. या सामन्यात काही जणांना भारतापेक्षापाकिस्तानचे पारडे जड वाटत आहे.

पाकिस्तामध्ये कोणताही देश खेळायला जात नाही. त्यामुळे पाकिस्तानचे सर्व सामने संयुक्त अरब अमिरातीमध्ये होतात. त्यामुळे येथील वातावरण आणि खेळपट्ट्या यांचा चांगलाच अंदाज पाकिस्तानच्या संघाला आहे. भारतीय संघ हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात पहिल्यांदा दुबईच्या या मैदानात उतरला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने अमिरातीमध्ये आतापर्यंत 18 सामने खेळले आहेत. त्यामुळे या गोष्टींचा फायदा पाकिस्तानला होऊ शकतो.

यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अखेरचा सामना इंग्लंडमध्ये खेळवला गेला होता. चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम फेरीत फेरीत पाकिस्तानने भारताला पराभूत केले होते. त्यामुळे गेल्या सामन्यात झालेल्या पराभवाचे दडपण भारतीय संघावर असेल. दुसरीकडे पाकिस्नातच्या संघाने मनोबल उंचावलेले असेल.

हाँगकाँगबरोबर सामना झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशीच भारताला पाकिस्तानबरोबर सामना खेळावा लागणार आहे. हा खरेतर भारतीय संघावर अन्याय आहे. कारण सध्याच्या युगात ट्वेन्टी-20 सामनेही सलग दोन दिवस खेळवले जात नाही. त्यामुळे पहिल्या सामन्यात खेळल्यावर थकलेला भारतीय संघ पाकिस्तानबरोबर दोन हात करणार आहे.

टॅग्स :आशिया चषकभारतपाकिस्तान