दुबई, आशिया चषक 2018 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आशिया चषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारताने बाजी मारली. या सामन्यात भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचे सोशल मीडियावर कौतुक झाले. सामन्याच्या 43व्या षटकात मोहम्मद आमीरसह उस्मान खान खेळपट्टीवर फलंदाजीसाठी होता. चहल त्याचवेळी उस्मानच्या जवळच क्षेत्ररक्षण करत होता. या सामन्यात चहलने उस्मानच्या बूटांची लेस बांधली. चहलची ही खिलाडूवृत्ती सोशल मीडियावर कौतुकास पात्र ठरली.
या सामन्यातील आणखी एक प्रसंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाकिस्तानचा क्रिकेट चाहता चक्क भारताचे राष्ट्रगीत गात असल्याचा हा व्हिडिओ आहे. पाहा हा व्हिडिओ...