Join us  

Asia Cup 2018 : पाकिस्तान ठरलाय भारतापेक्षा वरचढ

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 19 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2018 4:20 PM

Open in App
ठळक मुद्देभारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1978 ते 2017 या कालावधीमध्ये 129 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत.

नवी दिल्ली, आशिया चषक 2018  : भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही कट्टर वैरी संघ बऱ्याच दिवसांनी एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 19 सप्टेंबरला खेळवण्यात येणार आहे. पण आतापर्यंत झालेल्या या दोन्ही संघांतील सामन्यात पाकिस्तानचा संघ भारतावर वरचढ ठरलेला आहे.

भारताने आतापर्यंत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तानकडून एकदाही पराभव पत्करलेला नाही. पण अन्य सामन्यांमध्ये पाकिस्तानच्या संघाने जास्त सामना दिसले आहेत. आतापर्यंतच्या सामन्यापैकी 58 टक्के सामने पाकिस्तानने जिंकले आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये 1978 ते 2017 या कालावधीमध्ये 129 एकदिवसीय सामने खेळले गेले आहेत. या 129 सामन्यांमध्ये भारताने 52 सामने जिंकले आहेत, तर 73 सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला आहे.

टॅग्स :आशिया चषकभारतपाकिस्तान