Join us  

भारत-पाक सामन्यात 'हिट' झालेल्या 'त्या' ललनेला FBवर शोधायला जाऊ नका!

भारत-पाक सामन्यात क्रिकेटवेड्यांच्या नजरा मैदानावरून हटत नाहीत. पण, आशिया चषकातील पहिल्या सामन्यात मैदानावर फारसं काही थरारक घडत नसताना, एका कॅमेऱ्यानं प्रेक्षकांमधून एक सेन्सेशनल तरुणी शोधून काढली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 5:25 PM

Open in App

आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तानच्या सामन्यात दरवेळी मैदानावरील कल्ला गाजतो. पण, यावेळी प्रेक्षकांमधील एका पाकिस्तानी ललनेला पाहून भारतीय तरुणाईचा कलेजा खल्लास झाला आहे. भारत-पाकमधील दोन्ही सामने पाहायला, पाकिस्तानला चीअर-अप करायला ही 'मिस्ट्री गर्ल' दुबईच्या स्टेडियममध्ये उपस्थित होती. पाकिस्तान संघानं भारताकडून सपाटून मार खाल्ल्यानं तिची निराशा झाली, पण अनेकांच्या आशा पल्लवित झाल्यात. या 'पाकिस्तानी ब्युटी'चा शोध घेण्यासाठी तरुण जंग जंग पछाडताहेत. तुम्हीही त्यापैकीच एक असाल, तर तुमच्यासाठी एक मैत्रीचा सल्ला. या सुंदरीला फेसबुकवर शोधायच्या फंदात न पडलेलंच बरं.

भारत-पाक सामन्यात क्रिकेटवेड्यांच्या नजरा मैदानावरून हटत नाहीत. पण, आशिया चषकातील पहिल्या सामन्यात मैदानावर फारसं काही थरारक घडत नसताना, एका कॅमेऱ्यानं प्रेक्षकांमधून एक सेन्सेशनल तरुणी शोधून काढली आणि तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. 'सुंदरा मनामधी भरली', अशीच अनेकांची अवस्था होऊन गेली. त्यानंतर, ती काल पुन्हा दिसली, हसली आणि पोरं फसली. काही उत्साही मंडळींनी तिचं नाव निव्या नवोरा असल्याचं शोधून काढलं. तेही सोशल मीडियावरून जगाला कळलं आणि फेसबुकवरच्या सर्च बॉक्समध्ये ते कॉपी-पेस्ट करण्यात आलं. पण, बिच्चारे सगळेच मामा बनले. कारण, Nivya Navora नावाची बरीच अकाउंट आहेत. सगळ्यांवर प्रोफाइल पिक्चर म्हणून या तरुणीचाच फोटो आहे आणि बहुतांश अकाउंट काही तासांपूर्वीच तयार करण्यात आली आहेत. म्हणजेच ही ललना फेसबुकवर नसावी किंवा तिचं अकाउंट वेगळ्याच नावाने असावं. त्यामुळे उगाचच आशेनं फेसबुकवर शोधाशोध करू नका. ट्विटरवरही तिचं अकाउंट अजून सापडलेलं नाही.  

आता रातोरात स्टार झालेली ही तरुणी या प्रसिद्धीचा कसा वापर करते, याबद्दल उत्सुकता आहे. ती कोण आहे, काय करते, कुठे राहते, हे जाणून घेण्याचेही जोरदार प्रयत्न सुरू आहेत. 

टॅग्स :आशिया चषकभारत विरुद्ध पाकिस्तानसोशल व्हायरलसोशल मीडिया