Join us

Asia Cup 2018, India vs Afghanistan : टॉस उडवायला रोहित शर्माऐवजी 'कॅप्टन कूल' धोनी आला अन्...

तब्बल 696 दिवसांनंतर धोनी भारताचे कर्णधारपद भूषवत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 16:44 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : आशिया चषक स्पर्धेत महेंद्रसिंग धोनीला भारताचे कर्णधारपद देण्यात आले आहे. धोनीचा कर्णधार म्हणून हा 200वा एकदिवसीय सामना आहे.

या स्पर्धेसाठी रोहित शर्माची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली असली तरी या सामन्यात मात्र संघाचे नेतृत्त्व धोनीकडे सुपूर्द करण्यात आले आहे. कारण भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचल्यामुळे रोहितला विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि धोनीकडे संघाची कमान सोपवण्यात आली.

 

अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जेव्हा धोनी नाणेफेकीसाठी आला तेव्हा साऱ्यांच्याच भुवया उंचावल्या. तब्बल 696 दिवसांनंतर धोनी भारताचे कर्णधारपद भूषवत आहे.

 

 

टॅग्स :महेंद्रसिंह धोनीआशिया चषक