Join us

Asia Cup 2018 : अन् महेंद्रसिंह धोनीने केला अंबाती रायुडूचा 'फेस मसाज' 

Asia Cup 2018: भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला नमवून सहकाही अंबाती रायुडूला वाढदिवसाची भेट दिली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2018 16:27 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत रविवारी पाकिस्तानला नमवून सहकारी अंबाती रायुडूला वाढदिवसाची भेट दिली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत दुसऱ्यांदा पाकिस्तानला पराभूत करण्याची किमया केली. पाकिस्तानचे 238 धावांचे लक्ष्य भारताने रोहित ( नाबाद 111) आणि शिखर धवन ( 114) यांच्या शतकी खेळाच्या जोरावर 39.3 षटकांत पार केले. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 210 धावांची भागीदारी केली. 

पाकिस्ताननेही झेल सोडून भारताच्या विजयात हातभार लावला. या विजयानंतर भारतीय संघाने ड्रेसिंग रूममध्ये अंबाती रायुडूचा वाढदिवस साजरा केला. हे वाढदिवस साजरा करण्याचे फोटो भारतीय संघाने इन्स्टाग्रामवर शेअर केले. यामध्ये माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रायुडूच्या चेहऱ्यावर केक फासताना आघाडीवर असल्याचा दिसत आहे. सोशल मीडियावर धोनीच्या या फेस मसाजचीच दिवसभर चर्चा होती.  

टॅग्स :आशिया चषकमहेंद्रसिंह धोनी