Join us

Asia Cup 2018 : महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांना दुबईत भेटले 'चाचा' 

Asia Cup 2018: सुपर फोर गटात पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे मिळालेल्या विश्रांती वेळेत भारतीय संघाने दुबई भ्रमंती केली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 09:10 IST

Open in App

दुबई, आशिया चषक 2018 : सुपर फोर गटात पाकिस्तानला नमवून भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. त्यामुळे मिळालेल्या विश्रांती वेळेत भारतीय संघाने दुबई भ्रमंती केली. रोहित शर्मा आणि महेंद्रसिंह धोनी यांनीही दुबईत फेरफटका मारला. भटकंती करताना या दोघांना दुबईत 'चाचा' भेटले आणि त्यांच्यासोबत काढलेला फोटो सध्या व्हायरल होत आहेत. कोण आहेत हे चाचा ?

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मैदानावरील ठसन सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे हे दोन संघातील सामन्याची उत्सुकता होती. मात्र दोन्ही सामन्यांत भारताने पाकिस्तानला पराभवाची चव चाखवली. पण या दोन्ही सामन्यांत ती पारंपरिक ठसन गायब होती. भारताकडून पराभूत झालेल्या पाकिस्तान संघाचे सुपरफॅन असलेले बशीर चाचा यांना मात्र भारतीय खेळाडूंची भेट घेण्याचा मोह आवरला नाही. 

भारतीय संघ राहत असलेल्या हॉटेलमध्येच बशीर चाचा राहत असून बुधवारी त्यांना धोनी व शर्मा लॉबीत योगायोगाने भेटले. चाचांनी त्वरित त्यांना सोबत फोटो काढण्याची विनंती 

टॅग्स :आशिया चषकमहेंद्रसिंह धोनीरोहित शर्मा