दुबई, आशिया चषक 2018 : भारतीय संघाचे काही खेळाडू शुक्रवारी आशिया चषक स्पर्धेसाठी दुबईत दाखल झाले. दुबईत दाखल झालेल्या खेळाडूंमध्ये अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार रोहित शर्मा यांचा समावेश आहे. भारतीय संघातील 10 जणांचा चमू गुरुवारी मुंबईहून दुबईसाठी रवाना झाले होते, तर इंग्लंड दौऱ्यातील सदस्यांना दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे..
शनिवारपासून 50-50 षटकांच्या या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. अष्टपैलू केदार जाधव याने आपल्या ट्विटरवर रोहित, धोनी, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांच्यासोबतचा फोटो पोस्ट केला आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर जाधव राष्ट्रीय संघात कमबॅक करत आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
भारतीय संघाचा पहिला सामना 18 सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध होणार आहे आणि त्यानंतर बुधवारी कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत भारत भिडेल.