दुबई, आशिया चषक 2018 : भारतीय संघाने आशिया चषक स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला. पाकिस्तानला नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 162 धावा करता आल्या. भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी यावेळी प्रत्येकी तीन बळी मिळवले. पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करत रोहित शर्माने अर्धशतक झळकावत विजयात मोलाची भूमिका बजावली.
रोहितने 39 चेंडूंत सहा चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 52 धावा केल्या. शिखर धवनने 46 धावा करत रोहितला चांगली साथ दिली. हे दोघे बाद झाल्यावर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक यांनी प्रत्येकी नाबाद 31 धावांची खेळी साकारत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. सामनावीर ठरलेल्या भुवनेश्वरने या विजयाचा आनंद केप कापून साजरा केला. मात्र त्याच्या केप कापण्याच्या पद्धतीवर संमश्री प्रतिक्रिया तेय आहेत.
View this post on Instagram