Join us  

Asia Cup 2018 : आठव्या विकेटने भारताला झुंजवले, विजयासाठी 174 धावांचे लक्ष्य

Asia Cup 2018: बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ व मश्रफे मोर्ताझा यांनी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील लढतीत भारताविरुद्ध विक्रमाची नोंद केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2018 8:44 PM

Open in App
ठळक मुद्देरवींद्र जडेजाने 10 षटकांत 29 चेंडूंत 4 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

दुबई, आशिया चषक 2018 : बांगलादेशच्या मेहदी हसन मिराझ व मश्रफे मोर्ताझा यांनी आशिया चषक स्पर्धेतील सुपर फोर गटातील लढतीत भारताविरुद्ध विक्रमाची नोंद केली. दोघांनी आठव्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी करून नवा विक्रम केला. त्यांच्या या भागीदारीच्या जोरावर बांगलादेशने 150 धावांचा पल्ला पार केला. आठव्या विकेटने भारताला चांगलेच झुंजवले. बांगलादेशने 50 षटकांत सर्वबाद 173 धावा केल्या.बांगलादेशचा निम्मा संघ 65 धावांवर माघारी परतल्यानंतर भारत त्यांना झटपट बाद करेल असे वाटत होते. मात्र, महमदुल्लाह व मोसाडेक होसेन यांनी 36 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. महमदुल्लाहला चुकीचे बाद ठरवल्यामुळे ही जोडी फुटली. मात्र. मेहदी व मश्रफे यांनी आठव्या विकेटसाटी 66 धावा जोडून बांगलादेशला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मेहदीने 50 चेंडूंत दोन षटकार व दोन चौकार लगावत 42 धावा कुटल्या, तर मश्रफेने 32 चेंडूंत दोन खणखणीत षटकार खेचून 26 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.दुखापतग्रस्त हार्दिक पंड्याच्या जागी संघात स्थान मिळवलेल्या रवींद्र जडेजाने झोकात पुनरागमन केले. सुपर फोर गटातील बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर भारताने सामन्यावर मजबुत पकड घेतली. या कामगिरीसह त्याने तब्बल चार वर्षांनंतर एक पराक्रम केला. त्याने 10 षटकांत 29 चेंडूंत 4 विकेट घेतल्या. भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या.

 

टॅग्स :आशिया चषकभारतबांगलादेश