Join us  

Asia Cup 2018 : अफगाणिस्तानचे श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान

अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी 57 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पणअफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने बाद केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 8:39 PM

Open in App
ठळक मुद्देरहमतने 90 चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली.

दुबई, आशिया चषक 2018 : रहमत शाहच्या दमदार अर्धशतकाच्या जोरावर अफगाणिस्तानमे प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे 250 धावांचे आव्हान ठेवले आहे.

 

 

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानच्या सलामीवीरांनी 57 धावा करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. पणअफगाणिस्तानच्या दोन्ही सलामीवीरांना श्रीलंकेच्या अकिला धनंजयाने बाद केले.

अफगाणिस्तानला पहिला धक्का बसल्यावर रहमत फलंदाजीला आला आणि आपल्या दमदार खेळीने त्याने अफगाणिस्तानला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. रहमतने यावेळी 63 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. रहमतने 90 चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर 72 धावांची खेळी साकारली.

दुशमंथा चमीराने यावेळी थिसारा परेराकरवी रहमतला झेलबाद केले.

टॅग्स :आशिया चषकअफगाणिस्तानश्रीलंका