लंडन - भारताचा फिरकीपटू आर अश्विनने कौटी क्रिकेटमधील संघ वॉरसेस्टरशरसोबत करार केला आहे. त्यामुळे इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका संपल्यानंतर तो कौंटी चॅम्पियनशीप स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणार आहे. या स्पर्धेच्या शेवटच्या दोन सामन्यांत तो वॉरसेस्टरशर क्लबचे प्रतिनिधित्व करणार आहे.
अश्विन चेम्सफोर्ड आणि यॉर्कशर या संघांविरूद्ध खेळणार आहे. याआधीही अश्विनने वॉरसेस्टरशर संघाचे प्रतिनिधित्व केले आहे आणि तो आता व्हेन पार्नेलच्या जागी संघातून खेळणार आहे.
अश्विनला गत मोसमात चार सामन्यांसाठी करारबद्ध केले होते. त्याच्या कामगिरीच्या जोरावर वॉरसेस्टरशरने डिव्हीजन वनमध्ये स्थान पटकावले होते. या चार सामन्यांत अश्विनने 20 विकेट्स घेतल्या होत्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करताना 42च्या सरासरीने धावा केल्या होत्या.