Join us

अश्विनने अफगाणच्या खेळाडूंना आणले अडचणीत : सचिन तेंडुलकर

‘हार्दिक-पंत यांच्यामुळे खेळ पलटला’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 05:46 IST

Open in App

नवी दिल्ली : ‘टी-२० विश्वचषक सामन्याच्या दरम्यान अफगाणिस्तानच्या खेळाडूंकडे रविचंद्रन अश्विनच्या बॅकफ्लिप चेंडूचे कोणतेही उत्तर नव्हते’, असे मत भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी व्यक्त केले. मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत चार वर्षांनंतर पुनरागमन करत चार षटकांत केवळ १४ धावा देत दोन बळी घेतले. भारताने या सामन्यात अफगाणला पराभूत केले.

तेंडुलकर यांनी म्हटले की, ‘फक्त गोलंदाजीचाच प्रश्न असेल तर अश्विनला खूप काळानंतर पाहिले आहे. त्याने शानदार गोलंदाजी केली. त्याच्या बॅकफ्लिपचे उत्तर कोणत्याही अफगाण फलंदाजाकडे नव्हते. अश्विनने नेट्समध्ये या बॉलचा खूपच सराव केला आहे. त्याच्या चार षटकांत एकही चौकार लगावला नाही’.

तेंडुलकर पुढे म्हणाले की, ‘हार्दिक आणि पंत यांच्यातील भागीदारीने अखेरच्या ३.३ षटकांत भारताने ६३ धावा केल्या. त्यामुळेच खेळ पलटू शकला. विजयाचे जास्त अंतर भारतासाठी फायद्याचे राहिले. रोहित आणि राहुल यांनी शानदार फलंदाजी केली. अफगाणिस्तानने दोन्ही बाजूंनी फिरकीपटूंना गोलंदाजी दिली. ही चूक ठरली. अशा परिस्थितीत वेगवान गोलंदाज फायदेशीर ठरतात.’

टॅग्स :सचिन तेंडुलकरट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१
Open in App