पर्थ : आॅस्ट्रेलियाने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसºया कसोटी सामन्यात सोमवारी अखेरच्या दिवशी इंग्लंडचा डावाने पराभव करीत अॅशेसवर हक्क प्रस्थापित केला.
सामन्याचे चित्र बदलणारी द्विशतकी खेळी करीत जगातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये स्वत:ला सिद्ध करणाºया कर्णधार स्टीव्ह स्मिथने आपल्या यशात अॅशेस करंडकाची भर घातली. इंग्लंडचा दुसरा डाव सोमवारी २१८ धावांत संपुष्टात आला. आॅस्ट्रेलियाने या लढतीत एक डाव ४१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांच्या मालिकेत आॅस्ट्रेलियाने ३-० अशी विजयी आघाडी घेतली. आॅस्ट्रेलियाने यापूर्वी ब्रिस्बेन व अॅडिलेड कसोटीत विजय मिळवला आहे.
पॅट कमिन्सने ख्रिस व्होक्सला २२ धावांवर बाद करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली. पाचव्या दिवशी नाट्यमय घटना अनुभवाला मिळाली. वाकाच्या खेळपट्टीसोबत एक वाद जुळल्या गेला.
इंग्लंडची काल ४ बाद १३२ अशी स्थिती होती. इंग्लंडला डावाने पराभव टाळण्यासाठी १२७ धावांची गरज होती. पावसाच्या व्यत्ययामुळे आज उपाहारापूर्वी एकही चेंडू टाकला गेला नाही. त्यानंतर मैदानाच्या दक्षिण भागातील क्रिझजवळ एका
भागात बराच ओलसरपणा दिसून आला. वाकाच्या मैदानावरील कर्मचाºयांनी खेळपट्टी कोरडी करण्याची बरीच मेहनत घेतली,
पण वारंवार पाऊस येत असल्यामुळे त्यांच्या कार्यात अडथळा येत होता.
खेळ पुन्हा सुरू झाल्यानंतर भंगणाºया खेळपट्टीवर चेंडू धोकादायक पद्धतीने उसळत होता. अशा स्थितीत फलंदाज एकापाठोपाठ बाद झाले. पहिल्या डावातील शतकवीर जॉनी बेयरस्टॉला केवळ १४ धावा करता आल्या. डेव्हिड मलान ५४ धावा काढून तंबूत परतला.
(वृत्तसंस्था)
या शानदार विजयासह आॅस्टेÑलिया संघ घरच्या मैदानावर मागील चार अॅशेसपैकी तिसºयांदा व्हाईटवॉश देण्याच्या मार्गावर आहे. हे सर्व निवडकर्त्यांनी केलेल्या कठोर निवड प्रक्रीयेमुळे शक्य झाले. टिम पेनला नेहमीच देशाचा सर्वोत्तम यष्टीरक्षक मानले जाते. त्याने कमालीची फलंदाजी केली. शॉन मार्शही चांगला खेळला. तसेच, दोन्ही संघांच्या गोलंदाजीमध्ये खूप मोठा फरक होता.
- स्टीव्ह स्मिथ, आॅस्टेÑलिया कर्णधार
संघातील वरिष्ठ खेळाडूंकडे अनुभवाची कोणतीही कमतरता नाही. त्यांची आतापर्यंतची कामगिरी त्यांची क्षमता आणि गुणवत्ता दाखवून देणारी आहे. त्यांनी याआधीही अशा प्रतिकूल परिस्थितींचा सामना केला आहे. वरिष्ठ खेळाडू पुनरागमन करु शकणार नाही, अशातली गोष्ट नाही. तीन सामन्यांनंतर आम्हाला दडपणाखाली येऊन घाई घाईमध्ये कोणताही निर्णय घ्यायचा नाही.
- जो रुट, इंग्लंड कर्णधार
धावफलक
इंग्लंड पहिला डाव : ४०३. आॅस्ट्रेलिया : पहिला डाव ९ बाद ६६२ (डाव घोषित).
इंग्लंड दुसरा डाव : अॅलिस्टर कुक झे. व गो. हेझलवूड १४, मार्क स्टोनमॅन झे. पेन गो. हेझलवूड ०३, जेम्स विन्स त्रि. गो. स्टार्क ५५, ज्यो रुट झे. स्मिथ गो. लियोन १४, डेव्हिड मलान झे. पेन गो. हेझलवूड ५४, जॉन बेयरस्टॉ त्रि. गो. हेझलवूड १४, मोईन अली पायचित गो. लियोन ११, ख्रिस व्होक्स झे. पेन गो. कमिन्स २२, सी. ओवरटन झे. ख्वाजा गो. हेझलवूड १२, स्टुअर्ट ब्रॉड झे. पेन गो. कमिन्स ००, जेम्स अँडरसन नाबाद ०१. अवांतर (१८). एकूण : ७२.५ षटकांत सर्व बाद २१८. बाद क्रम : १-४, २-२९, ३-६०, ४-१००, ५-१३३, ६-१७२, ७-१९६, ८-२१०, ९-२११, १०-२१८. गोलंदाजी : स्टार्क १७-५-४४-१, हेझलवूड १८-६-४८-५, मार्श ३-१-१४-०, कमिन्स १९.५-४-५३-२, लियोन १५-४-४२-२.