Join us
Daily Top 2Weekly Top 5

आशीष नेहरा म्हणतोय... हाय ये बुढापा!

गोव्यात फनटाइम : मुलीसोबत व्यायाम करताना इन्स्टाग्रामवर शेअर केला व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2019 12:52 IST

Open in App

सचिन कोरडे, पणजी : भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आपला निवांत वेळ घालविण्यासाठी गोव्याला पसंती देतोय. तो बºयाचदा गोव्यात येऊन जातो. दिल्लीतील वाढत्या प्रदूषणामुळेच तो आपला फावला वेळ गोव्यात व्यतीत करतो. यासाठीच त्याने पर्वरी परिसरात एक बंगलाही भाड्याने घेतला आहे. सध्याही तो गोव्यातच असून, याबाबतीत त्याने गुप्तता पाळण्याचा प्रयत्न केला. मात्र, आशिषच्या पत्नीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केल्याने त्याचे बिंग फुटले.

या व्हिडीओत आशिष नेहरा आपल्या मुलीसोबत व्यायाम करताना दिसतोय. शरीर लवचिक असणे महत्त्वाचे असल्याने, तो आपल्या मुलीकडून व्यायाम करून घेतोय. मात्र, मुलीच्या लवचिकतेपुढे आपण म्हातारा झाल्याचे तो सांगतोय. हा व्यायाम करताना नेहराला ताण पडतोय. मात्र, त्याची मुलगी ते सहजपणे करून जाते आणि म्हणून तो ‘हाय बुढापा’ असे म्हणतोय. हा व्हिडीओ हजारांहून अधिक चाहत्यांनी ‘लाइक’ केला आहे. स्टार फलंदाज सुरेश रैनानेही ‘वाह... नेहराजी’ अशी कमेंट केली आहे. आशिषच्या पत्नीने झाडावरील आंब्यांचे फोटोही शेअर केले असून, त्याला ‘बेबी मॅँगोज’अशा ओळीसुद्धा दिल्या आहेत.

हा पाहा खास व्हिडीओ

नेहराने यापूर्वी दिल्लीतील वाढत्या प्रदूषणाबाबत प्रचंड चिंता व्यक्त केली होती. त्यामुळेच त्याने गोव्यात बंगला भाड्याने घेतला होता. काही महिन्यांपूर्वी नेहराने पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांची भेट घेतली होती. त्या वेळी नेहरा गोमंतकीय होणार का? याबबातही चर्चा सुरू झाली होती. आशिष नेहरा सध्या समालोचक म्हणून कार्यरत आहे. तो आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा गोलंदाजी प्रशिक्षकही आहे. नेहराने आपल्या मुलाखतीत दिल्लीबाहेर घर घेणार असल्याचे म्हटले होते. स्टार क्रिकेटपटू युवराज सिंग याचाही गोव्यातील मोरजी येथे बंगला आहे.

टॅग्स :आशिष नेहरागोवा