Join us

अ‍ॅशेस कसोटी: स्मिथच्या खेळीने कांगारुंकडे आघाडी

इंग्लंडला ३७४ धावांत रोखले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 01:42 IST

Open in App

बर्मिंघम : इंग्लंडचा पहिला डाव ३७४ धावांत गुंडाळल्यानंतर आॅस्ट्रेलियाने कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपल्या दुसºया डावात ३ बाद १२४ धावा केल्या आहेत. आॅस्ट्रेलियाकडे ३४ धांवाची आघाडी असून त्यांचे सात फलंदाज शिल्लक आहेत.शनिवारी इंग्लंडने चार बाद २६७ धावांवरून पुढे खेळण्यास प्रारंभ केला. शतकवीर रोरी बर्न्सने कालच्या १२५ धावांवरून प्रारंभ केला. लियोनने त्याला १३३ धावांवर बाद केले. बेन स्टोक्सने ५० धावा केल्या. वोक्स व स्टुअर्ट ब्रॉड यांनी नवव्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली. ब्रॉड २९ धावांवर बाद झाला, तर वोक्सने नाबाद ३७ धावा केल्या. इंग्लंडचा डाव ३७४ धावांत आटोपला. इंग्लंडला ९० धावांची आघाडी मिळाली. आॅस्ट्रेलियाकडून कमिन्स व लियोन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. दुसºया डावातही आॅस्ट्रेलियाचे सलामीवीर अपयशी ठरले बेनक्रॉप्ट (७) व वॉर्नर (८) स्वस्तात बाद झाले. त्यानंतर स्मिथने दुसºया डावातही सयंमी खेळी केली. दिवसभराचा खेळ संपला तेंव्हा स्मिथ ४६ तर हेड २१ धावांवर खेळत होते.संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया पहिला डाव : सर्वबाद २८४. इंग्लंड पहिला डाव : सर्वबाद ३७४; आॅस्ट्रेलिया दुसरा डाव: तीन बाद १२४; उस्मान ख्वाजा स्टिव्ह स्मिथ नाबाद ४६, हेड नाबाद २१

टॅग्स :अ‍ॅशेस 2019