Join us  

The Ashes: स्मिथचा जगावेगळा कव्हर ड्राइव्ह बघताना मज्जा येईल, फक्त तुम्ही धडपडू नका!

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंगलंडच्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवार पासून सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 1:58 PM

Open in App

मॅचेस्टर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंगलंडच्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्याला बुधवार पासून सुरुवात झाली. या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टिव स्मिथने तुफान फटकेबाजी करत अर्धशतक झळकावले आणि पुन्हा एकदा त्याने जगातला अव्वल फलंदाज का आहे, हे सिद्ध केले आहे. तसेच स्मिथने या सामन्यात एक अविश्वासनीय कव्हर ड्राइव्ह खेळत आपले अर्धशतक पूर्ण केले.  या जगावेगळा शॅाटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्य़ात ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॅार्नर पहिल्याच षटकात भोपळाही न फोडता माघारी परतला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं 28 धावांवरच दोन विकेट गमावल्या. मात्र त्यानंतर स्मिथनं लाबुशेनसोबत 116 धावांची संयमी खेळी खेळत शतकी भागीदारी केली. यानंतर  स्मिथनं बेन स्टोक्सच्या चेंडूवर जमिनीवर पडून जगावेगळा कव्हर ड्राइव्ह मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

तसेच लाबुशेन व स्मिथच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला पहिल्या दिवसअखेर तीन विकेट गमावून 170 धावांवर मजल मारता आली. स्मिथने अ‍ॅशेस मालिकेतील 4 सामन्यात 400चा आकडा पार करत 2 शतक व 2 अर्धशतक झळकाविले आहे.  तसेच त्याने पहिल्या कसोटी सामन्यात शतकी खेळी केली होती. तर, दुसऱ्या कसोटी सामन्यात 92 धावा केल्या होत्या. त्याचप्रमाणे आयसीसी कसोटी रॅकिंगमध्ये विराट कोहलीला स्मिथनं मागे टाकत अव्वल स्थान पटकाविले आहे.

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंडस्टीव्हन स्मिथ