Ashes Series: दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले

Ashes Series: ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर यजमान इंग्लंडने ॲशेस कसोटीच्या दुसऱ्या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर ६१ षटकांत ४ बाद २७८ धावांची मजल मारली.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:10 AM2023-06-30T06:10:27+5:302023-06-30T06:11:17+5:30

whatsapp join usJoin us
Ashes Series: Day 2 England, Kangaroos stumble despite Steven Smith's century | Ashes Series: दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले

Ashes Series: दुसरा दिवस इंग्लंडचा, स्मिथच्या शतकानंतरही कांगारू अडखळले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लंडन : ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांवर संपुष्टात आणल्यानंतर यजमान इंग्लंडने ॲशेस कसोटीच्या दुसऱ्या लढतीत दुसऱ्या दिवसअखेर ६१ षटकांत ४ बाद २७८ धावांची मजल मारली. इंग्लंड अजून १३८ धावांनी मागे आहे. ऑस्ट्रेलियाकडून स्टीव्ह स्मिथने शतक झळकावले, तर इंग्लंडच्या बेन डकेटचे शतक केवळ २ धावांनी हुकले.

झॅक क्रॉली, बेन डकेट आणि ओली पोप यांनी इंग्लंडला भक्कम स्थितीत आणले. क्रॉलीने ४८ चेंडूंत ४८ धावा करताना ५ चौकार मारले. डकेट-ओली पोप यांनी दुसऱ्या गड्यासाठी १०५ चेंडूंत नाबाद ८६ धावांची भागीदारी केली. डकेटने १३४ चेंडूंत ९ चौकारांसह ९८, तर पोपने ६३ चेंडूंत ४ चौकारांसह ४२ धावा केल्या. प्रमुख फलंदाज जो रुट (१०) अपयशी ठरला. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा हॅरी ब्रूक (४५*) आणि कर्णधार बेन स्टोक्स (१७*) खेळपट्टीवर होते. त्याआधी, स्मिथच्या विक्रमी शतकानंतरही ५ बाद ३३९ धावांवरून सुरुवात केलेल्या ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४१६ धावांमध्ये आटोपला. स्मिथने १८४ चेंडूंत १५ चौकारांसह ११० धावा केल्या. ॲलेक्स कॅरी (४३ चेंडूंत २२ धावा) आणि कर्णधार पॅट कमिन्स (३३ चेंडूंत नाबाद २२) यांच्यामुळे कांगारुंनी चारशे धावांचा टप्पा पार केला. जोश टंग व ओली रॉबिन्सन यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.

विक्रमी स्टीव्ह स्मिथ
    इंग्लंडमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या विदेशी फलंदाजांमध्ये स्मिथने आठ शतकांसह दुसरे स्थान पटकावताना स्टीव वॉला मागे टाकले. दिग्गज डॉन ब्रॅडमन (११) अव्वलस्थानी.
    स्मिथ ३२ शतकांसह कांगारुंकडून सर्वाधिक कसोटी शतके झळकावणारा स्टीव्ह वॉसह दुसरा फलंदाज ठरला. रिकी पाँटिंग (४१) अव्वल स्थानी.
    इंग्लंडमध्ये २ हजारांहून अधिक कसोटी धावा करणारा स्मिथ ब्रॅडमन, ॲलेन बॉर्डर आणि व्हिव्ह रिचर्ड्स यांच्यानंतरचा चौथा फलंदाज ठरला.
    स्मिथने ९९व्या कसोटीत ९ हजार धावा पूर्ण करताना सर्वात कमी सामन्यांत हा पल्ला गाठत वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा विश्वविक्रम मोडला. लाराने १०१ कसोटींत हा पल्ला गाठला होता.
    १५ हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारा स्मिथ नववा ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला.

धावफलक
ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. टंग ६६, उस्मान ख्वाजा त्रि. गो. टंग १७, मार्नस लाबुशेन झे. बेयरस्टो गो. रॉबिन्सन ४७, स्टीव्ह स्मिथ झे. डकेट गो. टंग ११०, ट्रॅविस हेड यष्टिचित बेयरस्टो गो. रुट ७७, कॅमरून ग्रीन झे. अँडरसन गो. रुट ०, ॲलेक्स कॅरी पायचीत गो. ब्रॉड २२, मिचेल स्टार्क झे. बेयरस्टो गो. अँडरसन ६, पॅट कमिन्स नाबाद २२, नाथन लायन झे. टंग गो. रॉबिन्सन ७, जोश हेझलवूड झे. रुट गो. रॉबिन्सन ४. अवांतर - ३८. एकूण : १००.४ षटकांत सर्वबाद ४१६ धावा. बाद क्रम : १-७३, २-९६, ३-१९८, ४-३१६, ५-३१६, ६-३५१, ७-३५८, ८-३९३, ९-४०८, १०-४१६. गोलंदाजी : जेम्स अँडरसन २०-५-५३-१; स्टुअर्ट ब्रॉड २३-४-९९-१; ओली रॉबिन्सन २४.४-३-१००-३; जोश टंग २२-३-९८-३; बेन स्टोक्स ३-१-२१-०; जो रुट ८-१-१९-२.
इंग्लंड : झॅक क्रॉली यष्टिचित कॅरी गो. लायन ४८, बेन डकेट झे. वॉर्नर गो. हेझलवूड ९८, ओली पोप झे. स्मिथ गो. ग्रीन ४२, जो रुट झे. स्मिथ गो. स्टार्क १०, हॅरी ब्रूक खेळत आहे ४५ , बेन स्टोक्स खेळत आहे १७. अवांतर- १८. एकूण : ६१ षटकांत ४ बाद २७८ धावा. बाद क्रम : १-९१, २-१८८, ३-२०८, ४-२२२ गोलंदाजी : मिचेल स्टार्क १२-०-७५-१; पॅट कमिन्स १२-२-३९-०; जोश हेझलवूड ११-१-६३-१; नाथन लायन १३-१-३५-१; कॅमरुन ग्रीन ७-०-४३-१; ट्रॅविस हेड ५-१-१०-०; स्टीव्ह स्मिथ १-०-१-०.

Web Title: Ashes Series: Day 2 England, Kangaroos stumble despite Steven Smith's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.