Ashes 2023, ENG vs AUS : भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video 

Ashes 2023, ENG vs AUS :  इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद १४ धावा केल्या होत्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2023 05:25 PM2023-06-17T17:25:37+5:302023-06-17T17:26:09+5:30

whatsapp join usJoin us
Ashes 2023, ENG vs AUS : 2 in 2 for Stuart Broad - First he gets Warner & now No.1 Test batter Labuschagne for golden duck, Video | Ashes 2023, ENG vs AUS : भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video 

Ashes 2023, ENG vs AUS : भारताच्या पराभवाचा इंग्लंड घेतोय बदला; स्टुअर्ट ब्रॉडचा ऑस्ट्रेलियाला दणका, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Ashes 2023, ENG vs AUS :  ॲशेस मालिकेतील  पहिल्या कसोटीत इंग्लंडने पहिला डाव ८ बाद ३९३ धावांवर घोषित केला आणि ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर बिनबाद १४ धावा केल्या होत्या. रूट ११८ धावांवर नाबाद असताना डाव घोषित करण्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा होता.  पण, स्टुअर्ट ब्रॉडने हा निर्णय योग्य ठरवला आहे. त्याने सलग दोन चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवला होता, परंतु आता हाच संघ इंग्लंडसमोर चाचपडताना दिसतोय. 


झॅक क्रॅवलीने ६१ आणि ऑली पोपने ३१ धावा करताना इंग्लंडची गाडी रुळावर आणली होती. जो रूटने १५२ चेंडूंत नाबाद ११८ धावा केल्या. हॅरी ब्रुकने ३७ चेंडूंत ३२ धावांची खेळी केली. बऱ्याच दिवसानंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या जॉनी बेअरस्टोने ७८ चेंडूंत ७८ धावांची खेळी करून रूटला चांगली साथ दिली. नॅथन लाएनने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. इंग्लंडने पहिल्या दिवशीच ८ बाद ३९३ धावांवर असताना डाव घोषित केला.


दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. ११व्या षटकात ब्रॉडच्या गोलंदाजीवर डेव्हिड वॉर्नर ड्राईव्ह मारायला गेला, परंतु चेंडूने बॅटची आतली किनार घेत यष्टींवर जाऊन आदळला. ब्रॉडने १५ वेळा वॉर्नरची विकेट मिळवली. पुढील चेंडूवर कसोटी क्रिकेटमधील नंबर वन फलंदाज मार्नस लाबुशेन बाद झाला. यष्टींमागे बेअरस्टोने अफलातून झेल घेतला. ऑस्ट्रेलियाचे दोन फलंदाज २९ धावांत माघारी परतले. उस्मान ख्वाजा आणि स्टीव्ह स्मिथ यांनी डाव सावरला आहे. दरम्यान स्मिथ अॅशेस मालिकेत इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या ऑसी फलंदाजांमध्ये ( १६३८*) तिसऱ्या क्रमांकावर सरकला आहे. डॉन ब्रॅडमन ( २६७४), अॅलेन बॉर्डर ( २००५) यांनी इंग्लंडमध्ये अॅशेस मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत. पण, बेन स्टोक्सने ऑसींना तिसरा धक्का देताना स्मिथची ( १६) विकेट मिळवली. ऑस्ट्रेलियाची ३ बाद ६७ अशी हालत झाली. 
 

 

Web Title: Ashes 2023, ENG vs AUS : 2 in 2 for Stuart Broad - First he gets Warner & now No.1 Test batter Labuschagne for golden duck, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.