Join us  

Ashes 2019 : इंग्लंडने मालिका बरोबरीत सोडवूनही 'अ‍ॅशेस' ऑस्ट्रेलियानं नेली, जाणून घ्या कारण

यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 9:39 AM

Open in App

अ‍ॅशेस 2019 : यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली.  जलदगती गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने रविवारी अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा 135 धावांनी पराभव केला. इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या 399 धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 263 धावांत संपुष्टात आला. ब्रॉड व जॅक लिच यांनी चार बळी मिळवले. पण, ही मालिका बरोबरीत सोडवूनही इंग्लंडला अ‍ॅशेस आपल्याकडे कायम राखता आली नाही. ती ऑस्ट्रेलियाच घेऊन गेली. जाणून घ्या या मागचं कारण...

एक वर्षाच्या बंदीनंतर ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात कमबॅक केलेल्या स्टीव्ह स्मिथनं या मालिकेत एकहाती दबदबा राखला. पाचव्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मोठी धावसंख्या उभारता आली नसली तरी मालिकेत सर्वाधिक 774 धावांचा विक्रम त्यानं नावावर केला. या मालिकेत त्यानं 3 शतकं ( एक द्विशतक) आणि तीन अर्धशतकं झळकावली. पाचव्या कसोटीत इंग्लंडने पहिल्या डावात 294 आणि दुसऱ्या डावात 329 धावा केल्या. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात 225 आणि दुसऱ्या डावात 263 धावा करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना 135 धावांनी जिंकला. जोफ्रा आर्चर मॅन ऑफ दी मॅचचा मानकरी ठरला, तर स्मिथ आणि बेन स्टोक्स यांना मालिकावीर म्हणून गौरविण्यात आले.

1972नंतर म्हणजे 47 वर्षांत प्रथमच अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सुटली. विशेष म्हणजे 47 वर्षांपूर्वीही इंग्लंडमध्येच झालेली मालिका बरोबरीत सुटली होती. 2000नंतर दोन्ही देशांनी प्रत्येकी 5-5 वेळा अ‍ॅशेस मालिका जिंकली आहे. मालिका बरोबरीत सुटल्यानंतरही इंग्लंडला अ‍ॅशेस मिळाली नाही. कारण ऑस्ट्रेलियानं 2017-18 ची अ‍ॅशेस मालिका जिंकली होती आणि गतविजेते म्हणून मालिका बरोबरीत सुटूनही अ‍ॅशेस ऑस्ट्रेलियाकडे कायम राहिली. 

टॅग्स :अ‍ॅशेस 2019आॅस्ट्रेलियाइंग्लंड